HomeBreaking Newsमुल बस स्थानकात पाकीट मार टोळीचा सुळसुळाट

मुल बस स्थानकात पाकीट मार टोळीचा सुळसुळाट

मुल बस स्थानकात पाकीट मार टोळीचा सुळसुळाट 

दोन चोरट्यांनी अठरा हजार रुपयावर मारला डला

मुल पोलिसांनी चोरट्यांना घेतले ताब्यात

चामोर्शी प्रतिनिधी,    चामोर्शी येथे आपल्या गावी जाण्यासाठी मूल बस स्थानकात बसमध्ये चढत असलेल्या एका नागरिकाच्या खिशातून अज्ञात चोरट्यांनी १८,००० रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी मुल पोलीस स्टेशनमध्ये भादंवि कलम ३०३(२) BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार यशवंत बाबुराव भरणे (वय ५२, रा. चामोर्शी) हे मूल बसस्थानकातून आपल्या गावी चामोर्शी कडे प्रवास करत असताना त्यांच्या पैश्यांची चोरी झाली. त्यांनी मूल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. तक्रार येताच पोलिसांनी तत्काळ पेट्रोलिंग दरम्यान व गुप्त माहितीनुसार आरोपी शरद वाघोजी रुयारकर (वय ४३, रा. वरोरा) याला मुल बस स्थानक परिसरातून ताब्यात घेतले.

पुढील तपासात त्याचा साथीदार ज्ञानेश्वर ऊर्फ नाना गुलाब मडावी (वय ५३, रा. वरोरा) यास देखील वरोरा येथून अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींकडून चोरीची संपूर्ण रक्कम १८,००० रुपये जप्त करण्यात आली आहे.

तपासादरम्यान उघडकीस आले की, या आरोपींविरुद्ध अन्य पोलीस ठाण्यांमध्ये देखील चोरीचे गुन्हे दाखल आहेत. सद्यस्थितीत दोघांचा पिसीआर रिमांड घेण्यात येत असून, पुढील तपास सुरू आहे. तपास अधिकारी म्हणून एपीआय वांजारी हे कार्यरत आहेत.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments