HomeBreaking Newsजानाळा येथील दुचाकी अपघातात दोन सख्या भावांचा मृत्यू

जानाळा येथील दुचाकी अपघातात दोन सख्या भावांचा मृत्यू

जानाळा येथील दुचाकी अपघातात दोन सख्या भावांचा मृत्यू

अंधारी नदीजवळील घटना

मूल प्रतिनिधी,  चंद्रपूर येथे दुचाकीने नागपूरला जाण्यासाठी लहान भावाला  मोठ्या भावाने सोडून देत असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदारा धडक दिली. यात दोन सख्या भावांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना चंद्रपूर मार्गावरील अंधारी नदीजवळ शुक्रवारी (दि.21) पहाटे 5 वाजता सुमारास घडली. शुभम राजू आकुलवार (24) व करण राजू आकुलवार (20) रा. जानाळा असे अपघातात ठार झालेल्या दोन सख्या भावांची नावे आहेत.

मूल तालुक्यातील जानाळा येथे पसरली शोककळा

मूल तालुक्यातील मौजा जानाळा येथील आकुलवार कुटुंबीयातील दोन सख्या भावाचा अपघातात मृत्यू झाल्याने जानाळा येथे शोककळा पसरली आहे. करण हा अभियंता म्हणुन आजच तो नागपूर येथे रूजू होणार होता. मात्र नियतीला हे मान्य नसावे.

मूल तालुक्यातील जानाळा येथील शुभम व करण हे होन्डा फॅशन प्लसन क्रं. एमएच 34 यू 1987 ने चंद्रपूरकडे जात होते. दरम्यान अंधारी नदीजवळ अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली, यात ते दोघेही जागीच ठार झाले. मृतकांना चंद्रपूर येथील सामान्यरुग्णालयात शवविच्छेदन करिता नेण्यात आले असून  शव नातेवाहिकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. मूल पोलिस स्टेशन येथे अज्ञात वाहन चालकाविरुद्ध विविध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments