ब्रेकिंग न्यूज
– दिवस रात्र उलटल्या नंतर नहरात वाहून गेलेला दिलीप सातपुते मिळाला
अंदाजे दोन किमी अंतरावर बेंबाळ जवळील तीन कवाळी फुलाजवळ सापडला मृतदेह
– देवी विसर्जनासाठी गेले होते दुगाळा ग्रामपंचायतचे सदस्य व प्रगतशील शेतकरी दिलीप सातपुते
– राजकीय नेत्यांची असंवेदनशीलता ; विधानसभेचे चेहरे भिरकलेच नाही
– सरपंच प्रिती भांडेकर व पोलिस प्रशासन यांची शोधकार्यासाठी धडपड अखेर यशस्वी
येसगाव प्रतिनिधी :-मुल तालुक्यातील दुगाळा माल येथील प्रगतशील शेतकरी व दुगाडा ग्रामपंचायतचे सदस्य दिलीप सातपुते वय (42)याचा गोसीखुर्दच्या नहरात दुर्गा देवी विसर्जन करीत असतांना पाण्याचा मोठा प्रवाह व पाण्याचा अंदाज न लागल्याने पाण्यात वाहून गेल्याची घटना दि. 13 आक्टोंबर रविवारला सकाळी 11.00 वाजताच्या सुमारास घडली.सदर घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत होती अखेर एक दिवस आणि रात्री लोटल्यानंतर सकाळी 9.00 वाजताच्या सुमारास चक दुगाळा घाटापासून दोन किमी अंतरावरील बेंबाळ जवळील तीन कवाळीत अखेर तो बेपत्ता सदस्य दिलीप सातपुते मिळाला आहे.
घटनेची माहिती पोलिसांना मिळताच तात्काळ पोलिस चमू घटना स्थळी दाखल होत शोध कार्य सुरू ठेवले होते .मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने बुडणाऱ्या व्यक्तीचा दिवस रात्र लोतूनसुधा शोध लागला नव्हता .त्यामुळे परिसरातही हळहळ व्यक्त करण्यात येत होती. मात्र अनेक परिश्रमानंतर चक दुगाडा ग्रामपंचायतच्या सरपंच प्रिती भांडेकर व पोलिस प्रशासन कडून शोधकार्यासाठी केविलवाणी धडपड कामात लागली असून मृतदेह दोन किमी अंतरावर सापडल्याची माहिती आहे.