Homeआरोग्यफिस्कुटी येते नि :शुल्क आरोग्य शिबीर संपन्न

फिस्कुटी येते नि :शुल्क आरोग्य शिबीर संपन्न

फिस्कुटी येते नि :शुल्क आरोग्य शिबीर संपन्न

प्रतिनिधी, मुल, lokwad.in.  , गॉस्पल इंडिया मिनिस्ट्रीज,चंद्रपूर आणि टाटा कॅन्सर केअर फाउंडेशन ह्यांच्या सयुक्त विद्यमाने फिस्कुटी येथे दिनांक 8 एप्रिल 2025 रोजी नि:शुल्क आरोग्य शिबीर फिस्कुटी येथील ग्रामपंचायत च्या पटांगणात आयोजित करण्यात आले.

सामान्यांना उपचार मिळावेत यासाठी गॉस्पल इंडिया मिनिस्ट्रीज चे संस्थापक-सचिव डॉ. अमोल परागे यांच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या शिबिरात एकूण 200 रुग्णांची तपासणी करण्यात आली.  शिबिरात प्रामुख्याने रक्त तपासणी, शुगर,ब्लड प्रेशर, तोंडाचे आजार, थायरॉईड, सिकलसेल, किडनी चे आजार, कॅन्सर तपासणी आणि स्त्रीयांचे मासिक पाळी संबंधित आजार विषयी चे तज्ज्ञ डॉक्टर कडून तपासण्या घेण्यात आल्या. व मार्गदर्शन करण्यात आले.

शिबिराचे उदघाटन फिस्कुटी गावचे सरपंच श्री.नितीन गुरनुले, डॉ आशिष बारब्दे,व संस्थेच्या व्यावस्थापिका सौ.ओमना परागे ह्याच्या हस्ते करण्यात आले.संस्थेच्या उद्दिष्ठाविषयी मार्गदर्शन करिताना सौं.ओमना परागे ह्यांनी सेवेच्या द्वारे समाजात ऐक्यता आणि समाजात बंधूभाव निर्माण करणे ह्या विषयी सांगितले, तसेच डॉ.आशिष बारब्दे ह्यांनी आरोग्य विषयक माहीती दिली.

आरोग्य शिबिर तपासणी साठी टाटा कॅन्सर केअर फाउंडेशन ची टीम.डॉ आशिष बारब्दे,डॉ ट्विंकल धेंगळे,सुरज साळुंके,नताशा देवघरे,वैष्णवी सहारे,ब्रदर रक्षक कोसणकर, सिस्टर वर्षा कोडापे, सिस्टर मर्सीस्टेला गजर, तसेच महाराष्ट्र ग्रामीण जीवन्नोन्नती अभियान फिस्कुटी च्या महिला सौ. ईद्रायणी जेंगठे, सौं.निता चौधरी, श्रीमती.रागिणी शेंडे,आशा सेविका फिस्कुटी, भावना गणवीर,अविता रस्से, चेतना पलिकोडावार, तसेच सौं.समिता दुपारे, श्री.शामराव कडाम, चंद्रकांत जेंगठे,आकाश जेंगठे,फिस्कुटी ग्रामपंचायत सभासद व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन श्री.राकेश कोडापे ह्यांनी केले

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments