Homeगडचिरोलीमध्यरात्री आमदार रामदास मसराम यांची धडक तपासणी; कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयातील त्रुटींनी उडाली...

मध्यरात्री आमदार रामदास मसराम यांची धडक तपासणी; कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयातील त्रुटींनी उडाली खळबळ”

सोनू वाळके, उपसंपादक, लोकवाद न्युज.

 

कुरखेडा | दि. २१ एप्रिल २०२६:
कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात आमदार रामदास मसराम यांनी रात्री १२ वाजता अचानक धडक भेट देत आरोग्य व्यवस्थेची कडक पाहणी केली. या मध्यरात्रीच्या तपासणीत रुग्णालयातील अनेक गंभीर त्रुटी उघडकीस आल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
पाहणीदरम्यान रुग्णालयातील स्वच्छतेचा अभाव, औषधसाठ्याची अपुरी व्यवस्था तसेच काही ठिकाणी डॉक्टर व कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती स्पष्टपणे समोर आली. या प्रकारावर आमदार मसराम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तीव्र शब्दांत जाब विचारत तात्काळ सुधारणा करण्याचे कडक आदेश दिले.
रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधताना अनेकांनी सेवा व्यवस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. याची गंभीर दखल घेत आमदारांनी, “रुग्णांच्या जीवाशी खेळ सहन केला जाणार नाही. निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल,” असा इशारा दिला.
या पाहणीवेळी काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत हरडे, सामाजिक कार्यकर्ते धनपाल मिसार, नगरसेवक आशिष काळे, माजी नगरसेवक उस्मान पठाण, सिराज पठाण, आसिफ शेख, राकेश चव्हाण, भावेश मुंगणकर, गजानन भोयर, नरेश शहारे, वैद्यकीय अधीक्षक अमित ठमके, वैद्यकीय अधिकारी आत्राम तसेच रुग्णांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या धडक तपासणीनंतर आरोग्य विभागात खळबळ उडाली असून, आता प्रत्यक्ष सुधारणा होणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments