चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा देवस्थान म्हणून जगप्रसिद्ध असलेले तीर्थक्षेत्र हें सौंदरयीकरण व विकास कामापासून कोसोदूर असताना शासनस्तरावरून विविध विकास कामाचे प्रस्ताव सादर करून पायपीट केल्यानंतर मुख्य रस्त्याचे कामं हाती लागले असताना, मार्कंडा देव येथे Maharashtra State Road Development Corporation (एमएसआरडीसी) अंतर्गत सुरू असलेल्या सिमेंट रस्ता व नाल्याच्या बांधकामात गुणवत्ता पूर्ण दर्जेदार कामं नं होता निकृष्ट पद्धतीने कामं संथ गतीने तसेच कामात गंभीर अनियमितता समोर येत आहेत. कामाची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट असून ठेकेदार मनमानी कारभार पद्धतीने,थातूर-मातुर काम करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गिट्टी टाकून ठेवण्यात आली असून त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. वाहनचालकांसह पादचाऱ्यांचीही प्रचंड गैरसोय होत आहे. विशेष बाब म्हणजे, काम सुरू असताना रस्त्याची एक बाजू वाहतुकीसाठी खुली ठेवणे अपेक्षित असताना, संपूर्ण रस्ता अडवून ठेवण्यात आला आहे. यामुळे ये-जा करणाऱ्यांची अक्षरशः दमछाक होत आहे. गावकऱ्यांनी या कामाच्या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला असता, ठेकेदाराने “आमच्या कामात हस्तक्षेप करू नका” अशी उघड धमकी देत नागरिकांचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही समोर आला आहे. या सर्व प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून संबंधित विभागाने तात्काळ हस्तक्षेप करून कामाची चौकशी करावी. योग्य दर्जाचे काम करून घ्यावे, अशी जोरदार मागणी होत आहे.