HomeWadsaआमदार रामदास मसराम यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामपूर्व आढावा सभा.

आमदार रामदास मसराम यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामपूर्व आढावा सभा.

सोनू वाळके, उपसंपादक, लोकवाद न्युज.

 

वडसा, दि. २२ एप्रिल २०२६

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने पंचायत समिती सभागृह, वडसा येथे तालुका स्तरावरील खरीप हंगामपूर्व आढावा सभा पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार . रामदास मसराम उपस्थित होते.

सभेत आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बियाणे, खते, सिंचन व्यवस्था, पीक नियोजन, तसेच शेतकऱ्यांच्या विविध अडचणी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांना वेळेवर आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे व उत्पादन वाढीसाठी योग्य मार्गदर्शन करणे यावर विशेष भर देण्यात आला.

आमदार रामदास मसराम यांनी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या समस्या तात्काळ सोडवण्याचे निर्देश देत, खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले.

यावेळी कृषी अधिकारी देसाईगंज कांबळे,कृषी अधिकारी कुरखेडा जाधव,कृषी अधिकारी कोरची मडावी, सहाय्यक कृषी अधिकारी
आरमोरी नाकाडे तसेच देसाईगंज,आरमोरी, कोरची, कुरखेडा येथील कृषी विभागाचे अधिकारी व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

 

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments