Homeचंद्रपूरशिकवणीशिवाय ग्रामीण विद्यार्थिनीची 94.60% गुणांसह चमकदार कामगिरी

शिकवणीशिवाय ग्रामीण विद्यार्थिनीची 94.60% गुणांसह चमकदार कामगिरी

🔷 नेहालिका ठिकरे हिचे दैदीप्यमान यश; भाजपातर्फे सत्कार

शिकवणीशिवाय ग्रामीण विद्यार्थिनीची 94.60% गुणांसह चमकदार कामगिरी

मूल प्रतिनिधी : दहावीच्या CBSE परीक्षेत 94.60 टक्के गुण मिळवत कु. नेहालिका गोपाल ठिकरे हिने उल्लेखनीय यश संपादन केले असून तिच्या या यशाबद्दल भारतीय जनता पक्षातर्फे राजोली येथे तिच्या निवासस्थानी जाऊन सत्कार करण्यात आला.

नेहालिका ही सिंदेवाही येथील देवयानी इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी असून, ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातून येत तिने कोणतीही खासगी शिकवणी न लावता हे यश मिळवले आहे. राजोली येथून दररोज सिंदेवाही येथे ये-जा करत तिने सातत्याने अभ्यास करून हे यश मिळवले, ही बाब विशेष उल्लेखनीय मानली जात आहे.

ती भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश पाटील ठिकरे यांची नात असून तिच्या यशामुळे परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या सत्कार प्रसंगी मुल भाजप शहर अध्यक्ष प्रवीण मोहूर्ले, दशरथ पाटील बोरकर (राजोली), माजी नगरपरिषद सभापती मिलिंद खोब्रागडे, किशोर कापगते, गजानन वलकेवार, चंदूभाऊ नामपल्लीवार, भाजयुमो तालुका अध्यक्ष श्रीधर पाखमोडे, महासचिव जितू टिंगुसले, रोहित रायपुरे, हितेश ठिकरे, विवेक ठिकरे, सचिन गेडाम, प्रवीण मोहूर्ले (चिमढा) तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

नेहालिकाच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून तिचे कौतुक होत असून, तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments