JEE Main 2026 मध्ये अर्णव वाकडेची उल्लेखनीय कामगिरी; 99.77 पर्सेंटसह ऑल इंडिया रँक 3712
कठीण परीक्षेत यश; कुटुंबीयांकडून अभिनंदनाचा वर्षाव
मूल/प्रतिनिधी : देशातील अत्यंत स्पर्धात्मक आणि कठीण समजल्या जाणाऱ्या JEE Main 2026 परीक्षेत अर्णव वाकडे याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. अर्णवने 99.77 पर्सेंटाईल मिळवत ऑल इंडिया स्तरावर 3712 वा क्रमांक पटकावला आहे.
या वर्षी सुमारे 15,38,468 परीक्षार्थींनी परीक्षा दिली होती. अशा तीव्र स्पर्धेत अर्णवने मिळवलेले यश हे त्याच्या कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि जिद्दीचे फलित मानले जात आहे.
अर्णवच्या या यशामुळे त्याच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असून वडील रवींद्र वाकडे, आई छत्रपाली वाकडे, भाऊ अनिमेष वाकडे तसेच नातेवाईकांनी त्याचे कौतुक करत अभिनंदन केले आहे.
अर्णवच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्याने भविष्यात आणखी मोठी यशे संपादन करावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.







