HomeBreaking Newsपोंभुर्णा तालुक्यातील रेती आणि घरकुलाचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येईल

पोंभुर्णा तालुक्यातील रेती आणि घरकुलाचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येईल

*पोंभुर्णा तालुक्यातील रेती आणि घरकुलाचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येईल*

 *आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास* 

*रेतीची अडचण सोडवण्यासाठी महसूल मंत्र्यांसमवेत महत्त्वपूर्ण बैठक घेणार*

*पोंभूर्णा येथे घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून देण्यासंदर्भात बैठक*

पोम्भूर्णा दि. 5: घरकुल योजना ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून, ग्रामीण व शहरी गरजू कुटुंबांना घराची सोय व्हावी यासाठी ही योजना राबवली जाते. मात्र, पोंभुर्णा तालुक्यातील अनेक घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध न झाल्यामुळे घरबांधणीच्या कामात विलंब होत आहे. घरबांधणीसाठी आवश्यक असलेली रेतीची अडचण सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन विस्तृत चर्चा करण्यात येईल. चर्चेतून लाभार्थ्यांना अधिक सुलभतेने रेती मिळण्याचा मार्ग मोकळा होईल आणि पोंभुर्णा तालुक्यातील रेती आणि घरकुलाचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

पोंभूर्णा तालुक्यातील घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून देण्यासंदर्भात वनविश्रामगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी माजी खासदार अशोक नेते, तहसीलदार पोंभुर्णा रेखा वाणी, गट विकास अधिकारी पंचायत समिती पोंभुर्णा विवेक बेल्लारवार, भाजपा प्रदेश महामंत्री अल्काताई आत्राम, सुलभाताई पिपरे,हरिभाऊ ढवस, विनोद देशमुख,राहुल संतोषवार,रोशन ठेंगणे, रवी मरपल्लीवार,राहुल पाल,अजित मंगळगिरीवार, दर्शन गोरंटीवार, ऋषी कोटरंगे, रवी गेडाम, तुळशीराम रोहनकर, बंडु बुरांडे,विस्तार अधिकारी प्रणय गरमडे, उप अभियंता प्रदीप बाराहाते आदिंची उपस्थिती होती.

आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, अर्ज केल्यानंतर 15 दिवसाच्या आत रेती उपलब्ध करून द्यायचा निर्णय केला आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी वेळेत होत नाही. पोंभूर्णा तालुक्यातील 3,528 अपूर्ण घरकुल पूर्ण करण्याकरिता 17 हजार 640 ब्राॅस रेतीची आवश्यकता आहे. घरकुलांना रेती उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसमवेत चर्चा करण्यात आली असून काही अंशी रेती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. घरकुल लाभार्थ्यांनी छोटे-छोटे घाट आरक्षित करून प्रत्येक गावातील घरकुलांना लागणारी रेती तहसीलदार आणि तलाठी यांच्या निरीक्षणात न्यायची. असा महाराष्ट्रातला पहिला प्रयोग करून आपण घरकुलांना मोफत रेती उपलब्ध करून द्यायची. रेती मिळण्यास येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्याशी बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात येईल. पोंभुर्णा तालुक्यातील रेती आणि घरकुलाच्या प्रश्न मार्गी लावणार असल्याचेही ते म्हणाले.

त्यासोबतच, पोंभुर्णा तालुक्यामध्ये पाणीपुरवठ्याच्या 32 योजना कार्यान्वित आहे. ज्या गावांमध्ये फ्लोराइड युक्त आणि दूषित पाणी आहे त्याची माहिती घ्यावी. पाणीटंचाईमध्ये ट्युबवेल, विहिरी, सोलर पंप लावून पाण्याच्या योजना आखण्यात येईल, असे आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments