HomeBreaking Newsआमदार बंटी भांगडिया यांच्या विकास कार्यावर विश्वास ठेवत चिमूर तालुक्यांतील अनेकांचा भाजप...

आमदार बंटी भांगडिया यांच्या विकास कार्यावर विश्वास ठेवत चिमूर तालुक्यांतील अनेकांचा भाजप प्रवेश

आमदार बंटी भांगडिया यांच्या विकास कार्यावर विश्वास ठेवत चिमूर तालुक्यांतील अनेकांचा भाजप प्रवेश 

प्रमोद राऊत चिमूर ;  आमदार किर्तीकुमार (बंटी) भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत व नेतृत्वात चिमूर येथे ग्रा. पं. सदस्या दाबकाहेटी विद्याताई श्रीरामे आणि काँग्रेस नेत्या चकजांभुळविहीरा (नवेगाव) अनिशाताई शंभरकर यांच्यासह काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.

चिमूर येथील निवासस्थानी तालुक्यातील ग्रा. पं. सदस्या दाबकाहेटी विद्याताई श्रीरामे आणि काँग्रेस नेत्या चकजांभुळविहीरा (नवेगाव) अनिशाताई शंभरकर यांच्यासह काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वावर व भारतीय जनता पार्टीच्या विकसनशील ध्येय-धोरणांवर प्रभावित होऊन तसेच, आमदार किर्तीकुमार (बंटी) भांगडीया यांच्या नेतृत्वात झालेला संपूर्ण चिमूर विधानसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास व समाजकार्यावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला. यावेळी आमदार बंटी भांगडीया यांनी सर्वांच्या गळ्यात भाजपाचा दुपट्टा टाकून पक्षात सहर्ष स्वागत केले.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments