भक्तिमय वातावरणात शारदीय नवरात्रौत्सव साजरा
मार्कंडादेव / चामोर्शि प्रतिनिधी, विदर्भाची काशी म्हनुन सर्वत्र परिचित मार्कंदादेव येथे श्री क्षेत्र जय संतोषी मॉं शक्तीपिठ संस्थान द्वारा आयोजित शारदीय नवरात्रोत्सव उत्सव साजरा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न करण्यात आला त्यात प्रामुख्याने संपुर्ण नवरात्री दरम्यान अंखड ज्योत प्रज्वलित ठेऊन सकाळच्या प्रहरी 5.45 मिनिटानी डॉ रविंद्र सुरपाम व त्यांची भर्या जयश्री सुरपाम यांच्या वतीने विधीवत होम हवन व पुजा अर्चना संपन्न झाली. पुजेचे सर्व संस्कार मठाधिपती आचार्यं श्री श्रीमंत संतोष सुरपाम यांनी केले असून सोबतच नऊ कन्या पुजन तसेच नगर भोजनासह महाप्रसादाचे वितरण सुद्धा करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाला शक्तीपिठ संस्थान च्या संस्थानच्या सचिव अल्का शेडमाके] ऊपाध्यक्ष छबिलदास सुरपाम] कोष्याध्यक्ष रत्नादेवी गेडाम] सदस्य वर्षा भाजीपाले माजी संरपच मंजुळा वेलादी] ग्रामपंचायत सदस्य ललिता मरस्कोले] वर्षा सरपे] मारोती जुनघरे] वामन शेन्डे] देवानंद सुरपाम] माजी सरपंच भगवान शेन्डे] मुकरु शेंडे ]मुकरु राऊत आदी मान्यवर तथा भक्तगण मोठ्या संख्येने ऊपस्थीत होते- अशी माहीती संस्थान च्या कोष्याध्यक्ष वर्षा भाजीपाले यांनी संस्थान तर्फे विविध लोकोपयोगी कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहीती दिली.







