HomeChimurआमदार किर्तीकुमार भांगडीया यांची गाव भेट तथा संवाद दौरा

आमदार किर्तीकुमार भांगडीया यांची गाव भेट तथा संवाद दौरा

आमदार किर्तीकुमार भांगडीया यांचा चिमूर तालुक्यातील भिसी पंचायत समिती क्षेत्रातील चिंचोली, डोंगर्ला व जामगाव (को.) येथे गाव भेट तथा संवाद दौरा कार्यक्रम

प्रमोद राऊत चिमूर :- आमदार किर्तीकुमार (बंटी) भांगडीया यांनी आज चिमूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टी भिसी-आंबोली जिल्हा परिषद क्षेत्राअंतर्गत भिसी पंचायत समिती क्षेत्रातील चिंचोली, डोंगर्ला व जामगाव (को.) या गावांमध्ये विविध ठिकाणी भेट दिली व कॉर्नरसभेत स्थानिक ग्रामस्थांशी मनमोकळा संवाद साधला.

या गाव भेट तथा संवाद दौऱ्याप्रसंगी आमदार किर्तीकुमार (बंटी) भांगडीया यांनी विविध मंदिर देवस्थान, श्री गुरुदेव सेवा मंडळ व नवरात्र उत्सव मंडळांना भेटी देऊन मनोभावे दर्शन घेतले आणि सर्वांना नवरात्र उत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या. भाजपा ज्येष्ठ कार्यकर्ते देवराव दडमल यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली व त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. मुख्यतः दिव्यवंदना आधार फॉऊंडेशन व मराठा लाईफ फॉऊंडेशन द्वारा संचालित रोडवरील बेघर, बेवारस, भिक्षेकरी, निराधार, अनाथ, मनोरूग्न, पुनर्वसन केंद्र व वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी फॉऊंडेशनच्या वतीने वस्त्रे (कपडे) वितरित करण्यात आले. तसेच, फॉऊंडेशनचे संचालक शुभम पसारकर यांनी केलेल्या उत्कृष्ट सेवा तथा समाजकार्याबद्दल त्यांचा शाल-श्रीफळ भेट देऊन सत्कार करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, समस्त ग्रामवासीयांच्या वतीने विविध ठिकाणी आमदार किर्तीकुमार (बंटी) भांगडीया यांचे उस्फूर्तपणे औक्षण करीत स्वागत तथा शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विविध भाजपा नेते, पदाधिकारी तथा कार्यकर्ते आणि स्थानिक ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments