HomeBreaking Newsमुल तालुक्यातील अंगाला शहारे आणणारी खुनाची घटना

मुल तालुक्यातील अंगाला शहारे आणणारी खुनाची घटना

मुल तालुक्यातील अंगाला शहारे आणणारी खुनाची घटना

मुल तालुका कडकडीत बंद ठेवत दोषींना फासावर लटकवन्याची नागरिकांची मागणी

मूल नगरीत रविवारी रात्री घडलेल्या रक्तरंजित प्रेम कामडे खूनप्रकरणी निषेध नोंदविण्यासाठी सोमवारी दिवसभर मूल नगरीने कडकडीत बंद पाळला तर काही काळासाठी वाहतूक ही अडवून ठेवण्यात आली होती तर दुसरीकडे दोषींवर कडक कारवाई करुन त्यांना फासावर लटकवण्याच्या मागणीसाठी महिलांसह नागरिक मूल पोलिस ठाण्यात ठिय्या देऊन बसले होते.

पोलिसांनी आरोपींना तातडीने ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले व ५दिवसांची पोलिस कोठडी मिळवली, यापूर्वी जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतक प्रेम कामडेचे कुटुंबातील सदस्यांची विचारपूस करीत सांत्वन करीत न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.

तर नियोजित शारदा विसर्जन नगरातील विविध (३५)जवळपास तीन डझनभर महिला मंडळांनी कोणताही गाजावाजा न करता कुठल्याही संगीत , ढोलताशांच्या गजरात न करता मुकपणे शांतीपूर्ण मार्गाने संपन्न करीत घडलेल्या घटनेचा एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने निषेध करीत पार पाडला आणि एका वेगळ्या सहानुभूती ची व नगरवासियांप्रती आपुलकीची झलक दाखवली जी नगरवासियांनी अनुभवलेल्या थरार खूनप्रकरणी सहानुभूतीची आपली स्वतंत्र अशी उत्स्फूर्त अशी निषेधार्थ प्रतिक्रिया होती.

एकीकडे शारदा उत्सवाचे निमित्ताने स्नेह भोजन सोहळा सुरु असताना सर्वांसमक्ष घडलेल्या या थरार खूनशी हल्ल्याचा हा नगरवासियांनी केलेला जाहीर निषेध म्हणूनच इतिहासात यांची नोंद घेतली जाईल.

असा हा आगळावेगळा विसर्जन सोहळा मूल नगरीने यांची डोळा अनुभवलाआणि रविवारी रात्री कर्णकर्कश आवाजात पार पडलेल्या दूर्गा विसर्जनानंतर आज मुकपणे शारदा विसर्जन करीत आम्ही उत्सवप्रिय असलो तरीही शांती प्रिय असल्याचाही अनुभव नगरवासियांनी, महिलांनी आपल्या कृतीतून दाखवून दिला.ही बाब नगरात चर्चेचा विषय ठरली आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments