नागभीड तालुक्यातील शेतकऱ्यांला वरदान ठरलेल्या घोडझरी तलावाची मुख्य कॅनल येनोली माल जवळ फुटल्याने शेतकरी संकटात
प्रमोद राऊत चिमूर
शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास दरवर्षी घोडझरी पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळेशेतकऱ्यांना आता पिकावर फटका बसणार असून याला जिम्मेदार सर्वस्वी घोडाझरी पाटबंधारे विभाग व लोकप्रतिनिधी आहे असा शेतकऱ्यांमध्ये चर्चा रंगायला सुरवात झाली आहे.
दरवर्षी कुठून ना कुठून मुख्यकॅनल फुटत असून याबाबत घोडझरी पाटबंधारे विभाग यांना माहिती देऊनही याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. आज राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा समन्वयक चिमूर विधानसभा क्षेत्र डॉ. सतिश वारजूकर यांनी येनोली येथे जाऊन कॅनलची पाहणी केली व संबंधित अधिकाऱ्याची चर्चा केली असता अधिकाऱ्यांनी पाच वर्षापासून शासनाला या कामाबाबत प्रस्ताव पाठवलेला आहे पण अजून पर्यंत कुठलीच कारवाई झालेली नाही. असे सांगितले असता, यावेळी डॉ. सतीश वारजूकर यांनी तात्काळ कॅनल दुरुस्त करण्यात यावा असे निर्देश दिले.
यावेळी काँग्रेस नेते तथा सरपंच कन्हाळगांव रमेश घुगुस्कर, सरपंच येनोली अमोल बावनकर, जेष्ठ नेते डॉ. गिरडकर, सोनू नुरानी, बल्लू गेटकर, चोकेश्वर मसराम, विपुल गेडाम भाऊराव मेश्राम, पितांबर शेंडे, दौलत शिवणकर, विलास मारभते आदी शेतकरी उपस्थित होते.







