HomeBreaking Newsटुव्हीलरवरचा ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात युवकाचा मृत्यू

टुव्हीलरवरचा ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात युवकाचा मृत्यू

टुव्हीलरवरचा ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात युवकाचा मृत्यू 

सातारा तुकूम गावाजवळची घटना 

घटमाऊली देवस्थानातील दोन दिवसांचे कार्यक्रम रद्द

पोंभूर्णा :- चंद्रपूर येथील काम आटोपून डोंगर हळदी गावाकडे परत येत असताना सातारा तुकूम गावानजीक टुव्हीलरवरचा ताबा सुटल्याने झाडाला दिलेल्या धडकेत एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना दि.१२ आक्टोंबर शनिवारला संध्याकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली.संदेश शामराव लेनगुरे वय(३५) रा.डोंगर हळदी तुकूम असे मृतक युवकाचे नाव आहे.

पोंभूर्णा तालूक्यातील उमरी पोतदार पोलिस स्टेशन हद्दीत येत असलेल्या डोंगर हळदी तुकूम येथील संदेश लेनगुरे हा चंद्रपूर येथे कामा निमित्त गेला होता.चंद्रपूर येथील काम आटोपून तो डोंगर हळदी तुकूम गावाकडे टुव्हीलरने परत येत असताना सातारा तुकुम गावानजीक टुव्हीलर क्रमांक (MH 34 BP 5096) गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्यालगतच्या झाडाला धडक दिली या धडकेत त्याच्या डोक्याला जबर मार लागून तो गंभीर जखमी झाला.त्याला तात्काळ चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले.मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.सदर घटनेचा पुढील तपास उमरी पोतदार पोलिस करीत आहेत.त्याचे पश्चात आई,वडील, पत्नी व दोन छोट्या मुली आहेत.सदर घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.एकीकडे अख्खा गाव प्रसिद्ध असलेल्या घटमाऊली देवस्थानात नवरात्र महोत्सव व दसरा सणाची तयारी करीत असतांना अचानक गावातील युवकाचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.गावातील युवकाचा मृत्यू झाल्याने घटमाऊली देवस्थानातील दोन दिवसांचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments