शिवाजी महाराज जयंती निमित्त रुग्णांना फळ वाटप
प्रतिनिधी, पोंभुर्णा. छत्रपती शिवाजी महाराज जन्म तिथी नुसार १७ मार्च महाराजांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून टायगर संस्था व मित्रपरीवार पोंभुर्णा यांच्या वतीने ग्रामीण रुग्नालयातील रुग्णांना फळे, ब्रेड, तथा चिक्की सह आदी आवश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आले.
यावेळी टायगर संस्था चे अध्यक्ष रजत ढोंगे व्यंकटेश चिपावार, अविनाश सातपुते, यशवंत ढोंगे, उदय बोबडे, ईश्वर सातपुते, सूरज वैरागडे, दुर्वास घोंगडे, टायगर संस्थेचे पदाधिकारी सदस्य तथा मित्र मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते.
हिंदवी स्वराज्याची स्थापन करून जनतेचे सुस्वराज्य निर्माण करणारे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांना मानवंदना देऊन जन्म तिथी नुसार होणाऱ्या जयंतीच्यावनिमित्तने ग्रामीण रुग्णालय पॉम्भूर्णा येथे टायगर या सामाजिक संस्थे वतीने रुग्णाना फळे, बिस्कीट, ब्रेड, तथा चिक्कीचे वाटप करण्यात आले.
संघटनाचे कार्य कौतुकास्पद असून सदर कार्याबद्दल संघटनेचे अध्यक्ष रजत ढोंगे व संघटनाचे कौतुक केले जात आहे.







