HomeBreaking Newsओबीसी महासंघाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन :- धनराज मुंगले

ओबीसी महासंघाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन :- धनराज मुंगले

ओबीसी महासंघाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन :- धनराज मुंगले 

चिमूर तालुका प्रतिनिधी – राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने विदर्भात ओबीसी संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या ओबीसी संवाद यात्रा ही विदर्भातील ११ जिल्हयातून मार्गक्रमण करित बुधवारला दुपारी १२.०० वाजता चिमूर येथील शेतकरी भवन सभागृहात झाले. त्या ओबीसी संवाद यात्रेचे ओबीसी जनगणना परिषद व इतर संघटनाच्या वतीने स्वागत करण्यात आले होते. ओबीसी महासंघाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन असे आस्वासन प़मुख उपस्थिती म्हणुन प़बोधन करतांना धनराज मुंगले यांनी दिले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिन राजुरकर महासचिव, राष्ट्रीय ओबीसी महासंघ हे होते. कार्यक्रमांचे प्रमूख पाहुणे म्हणून श्याम लेडे राज्याध्यक्ष, राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघ, राजु चौधरी, नागपूर रविंद्र टोंगे जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघ चंद्रपूर (ओबीसी आरक्षणासाठी २१ दिवस उपोषणाला बसलेले) कार्यक्रमांचे प्रमुख वक्ते म्हणून ऋषम राऊत नागपूर व ओबीसी शिष्यवृती) कार्यक्रमांचे प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सतिश वारजूकर प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रीय ओबीसी महासंघ ,श्रीहरी सातपूते विदर्भ उपाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघ, भावना बावनकर जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय ओबीसी महीला महासंघ चंद्रपूर, कवडू लोहकरे तालुका अध्यक्ष, राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी-अधिकारी महासंघ, यामिनी कामडी तालुकाध्यक्ष, राष्ट्रीय ओबीसी महीला महासंघ, राजकुमार माथुरकर तालुकाध्यक्ष, राष्ट्रीय ओबीसी किसान महासंघ चिमूर, वैभव ठाकरे तालुकाध्यक्ष, राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघ चिमूर तर प्रमूख उपस्थिती म्हणून धनराज मुंगले राष्ट्रीय ओबीसी संघटक हे होते.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक रामदास कामडी, जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी-अधिकारी महासंघ, यांनी केले संचालन प्रभाकर पिसे मार्गदर्शक राष्ट्रीय ओबीसी महासंघ व मिनाक्षीताई बंडे जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महीला महासंघ, चंद्रपूर यांनी केले. तर आभार लक्ष्मीताई शिवरकर राष्ट्रीय ओबीसी महीला महासंघ, चिमूर यांनी मानले.

सदर कार्यक्रमाला राष्ट्रीय ओबीसी महासंघ, राष्ट्रीय ओबीसी महीला महासंघ, राष्ट्रीय ओबीसी किसान महासंघ, राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी-अधिकारी महासंघ, राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघ चिमूर आदी उपस्थित होते.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments