जाहीर आवाहन : पेट्रोल-डिझेलचा साठा मुबलक, अफवांवर विश्वास ठेवू नका – तहसीलदार मृदुला मोरे
लोकवाद न्यूज मुल / प्रतिनिधी, दि. २५ मार्च :
सध्याच्या परिस्थितीत देशातील काही भागांमध्ये सुरू असलेल्या तणावपूर्ण घडामोडींमुळे चंद्रपूर जिल्ह्यासह मुल तालुक्यात इंधन टंचाईबाबत अफवा पसरत असल्याचे निदर्शनास येत आहे. या अफवांमुळे नागरिकांमध्ये अनावश्यक भीतीचे वातावरण निर्माण झाले असून काही ठिकाणी पेट्रोल पंपावर अतिरिक्त गर्दी होत आहे.
या संदर्भात तहसीलदार मृदुला मोरे यांनी स्पष्ट केले आहे की, मुल तालुक्यात पेट्रोल व डिझेलचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची टंचाई नाही. सर्व पेट्रोल पंपांवर नियमितपणे इंधनाचा पुरवठा सुरळीत सुरू आहे.
नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून पेट्रोल पंपावर अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे सूचना नागरिकांना करण्यात आले आहे.
अधिकृत माहितीसाठी नागरिकांनी जिल्हा किंवा तालुका प्रशासनाशी संपर्क साधावा. नागरिकांनी संयम राखून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन सुद्धा तहसीलदार मृदुला मोरे यांनी केले आहे.







