HomeBreaking Newsशिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली नव्या ऊर्जेचा संचार

शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली नव्या ऊर्जेचा संचार

शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली नव्या ऊर्जेचा संचार 

मूल शहरात भव्य जनसंपर्क कार्यालय उद्घाटन व पक्ष प्रवेश सोहळा

गौतम जीवने मूल – शिवसेनेचा भगवा झेंडा पुन्हा जोमानं फडकला! मूल शहरात झालेल्या भव्य जनसंपर्क कार्यालय उद्घाटन आणि पक्ष प्रवेश सोहळ्याने संपूर्ण परिसरात नव्या ऊर्जेचा संचार झाला.

या सोहळ्याला युवासेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य हर्षल शिंदे, जिल्हा प्रमुख युवराज धानोरकर, तसेच युवा सेना जिल्हा प्रमुख शैलेश केळझरकर यांच्या प्रमुख उपस्थितीने विशेष गती लाभली. पाहुण्यांच्या हस्ते कार्यालयाचं विधिवत उद्घाटन करण्यात आलं.

या वेळी नव्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून पक्षाच्या विचारधारेप्रती आपली निष्ठा व्यक्त केली. जय भवानी, जय शिवाजी! या घोषणांनी मूल शहर दुमदुमून गेलं.

कार्यक्रमाला चेतन उजवणे (वैद्यकीय जिल्हाप्रमुख), संदीप भोईर (शिवसेना विधानसभा प्रमुख, चंद्रपूर), पवन यादव (शहर प्रमुख, युवा सेना चंद्रपूर), विशाल कावणे (युवा सेना विधानसभा प्रमुख), अंकुश कोठारी (शहर समन्वयक, युवा सेना चंद्रपूर) आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली.

तसेच भारती लाकडे (महिला जिल्हाप्रमुख), विशाल नागुलवार (शिवसेना तालुकाप्रमुख), शितल बेलपूरवार (विधानसभा प्रमुख), स्वप्निल अखेर (युवा सेना तालुकाप्रमुख), टिंकू दुधे (मूल शहर प्रमुख), शालिनी खैरे (महिला तालुकाप्रमुख), अर्चना सहारे (महिला सेवा प्रमुख), उर्मिला कोहळे (उपशहर प्रमुख), आशिष टिकले (उपतालुकाप्रमुख), वंदना टिकले (महिला उपतालुकाप्रमुख), सतीश वैरागडे (शहर सचिव), संतोष पिपलवार, विनोद चांदेकर (विधानसभा प्रमुख), पंकज पाटील, संतोष पारलेवार (शहर प्रमुख, पोंभुर्णा) आणि जयांत मंडळे (उपतालुकाप्रमुख) यांचीही उपस्थिती होती.

या प्रसंगी मान्यवरांनी संघटन बळकट करण्यासाठी एकत्रित कार्य करण्याचं आवाहन केलं. तर नव्याने शिवसेनेत दाखल झालेल्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या धोरणांप्रती अखंड निष्ठा ठेवून पुढील काळात अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments