HomeBreaking Newsमूल नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी अनेक उमेदवारांचा भाजपकडे दावा !

मूल नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी अनेक उमेदवारांचा भाजपकडे दावा !

मूल नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी अनेक उमेदवारांचा भाजपकडे दावा !

प्रतिनिधी मूल :  मूल नगर परिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पद हे इतर मागास प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित असल्याने या पदासाठी इच्छुकांची चढाओढ सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर मूल येथील शिवानी संदीप आगडे यांनीही नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी आपले नाव पुढे केले आहे. त्या भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यास उत्सुक असून सध्या त्या पक्षातर्फे उमेदवारीसाठी दावा केला आहे. 

शिवानी संदीप आगडे या मूल शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा व्यवसायिक संदीप आगडे यांच्या अर्धांगिनी असून त्या इंजिनिअर पदवीधर आहेत . गेल्या काही वर्षांपासून सामाजिक कार्यात आहेत.
नगर परिषद निवडणूक जवळ येत असल्याने भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी इच्छुकांकडून अर्ज मागविले आहेत. तसेच भाजपा, काँग्रेस आणि इतर पक्षांनीही उमेदवार निवड प्रक्रियेसाठी अर्ज भरून घेत आहेत. नगर परिषद अध्यक्ष पदासाठी सत्ताधारी भाजपकडे अनेक उमेदवारांनी उमेदवारीसाठी दावा केला आहे. तसेच काँग्रेसकडून सुद्धा अनेक होतकरू महिलांनी पक्षाकडे उमेदवारी मिळावी म्हणून अर्ज भरून दिले असल्याचे सांगण्यात आले आहे.
lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments