HomeBreaking Newsमुल कर्मवीर महाविद्यालय क्रीडांगणात दोन बिबट्यांचे पिल्लू दिसताच फिरणाऱ्यांची उडाली तारांबळ

मुल कर्मवीर महाविद्यालय क्रीडांगणात दोन बिबट्यांचे पिल्लू दिसताच फिरणाऱ्यांची उडाली तारांबळ

मुल कर्मवीर महाविद्यालय क्रीडांगणात दोन बिबट्यांचे पिल्लू दिसताच फिरणाऱ्यांची उडाली तारांबळ

फिरायला येणाऱ्या नागरिकांत धास्ती

यापूर्वीही फिरायला येणाऱ्याना झाले वाघ व बिबट्याचे दर्शन

वनविभागान तातडीने बंदोबस्त करावा नागरिकांची मागणी

प्रतिनिधी मूल, शहरातील कर्मवीर महाविद्यालयाच्या प्रसिद्ध क्रीडांगणावर रविवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास बिबट्याची दोन पिल्ले झाडावर बसलेली आढळून आली. रोजच्या प्रमाणे फिरायला आलेल्या नागरिकांना हे दृश्य पाहता आले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. तर यापूर्वी सुद्धा असाच प्रकार घडला आहे.

या क्रीडांगणावर दररोज गावकरी, युवक व महिला मोठ्या संख्येने फिरायला येतात. याशिवाय परिसरात महाविद्यालयदेखील असल्याने अनेक विद्यार्थी ये-जा करतात. त्यामुळे या सर्वांना प्राण्यांच्या हल्ल्याचा धोका निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या बछड्यांची आई जवळपास असण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात असून, पुराच्या पाण्यापासून बचाव करण्यासाठी मादी झाडावर बसलेली बिबट्याची पिल्ले बिबट्याने बछड्यांना झाडावर ठेवले असावे, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनेची माहिती नागरिकांनी तत्काळ वनविभागाला दिली. वनविभागाने त्वरित गस्त वाढवली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे जंगलातील बिळे, गुहा आणि नैसर्गिक अधिवास पाण्याखाली आले आहेत. त्यामुळे बिबट्या, रानडुक्कर व इतर वन्यजीव मानवी वस्त्यांच्या जवळ दिसू लागले आहेत. वनविभागाने नागरिकांना घाबरून न जाता सावधगिरी बाळगण्याचे तसेच कोणतीही वन्यजीव हालचाल दिसल्यास तत्काळ माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments