HomeBreaking Newsभीमणी नदीपात्रात आढळलेला मृत वाघाचा मृतदेह पाण्याच्या प्रवाहाने गेला वाहून

भीमणी नदीपात्रात आढळलेला मृत वाघाचा मृतदेह पाण्याच्या प्रवाहाने गेला वाहून

भीमणी नदीपात्रात आढळलेला मृत वाघाचा मृतदेह पाण्याच्या प्रवाहाने गेला वाहून

वन विभागाची शोध मोहीम सुरु 

पोंभुर्णा प्रतिनिधी, ता. १४: पोंभुर्णा तालुक्यातून वाहणाऱ्या भीमणी नदीच्या पात्रात वाघाचा मृतदेह आढळून आला. ही घटना शनिवार (ता. १३) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास उघडकीस आली. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी येईपर्यंत मृत वाघ पाण्याच्या प्रवाहात समोर वाहून गेला. त्यामुळे वनविभागाने शोधमोहीम सुरू केली असून अजूनपर्यंत मृत वाघाचा काही पत्ता लागला नाही.

तालुक्यातून भीमणी नदी वाहते. शनिवारी शेतीचे काम आटोपून शेतकरी, मजूर गावाकडे जात होते. याचदरम्यान त्यांना भीमणी नदीच्या पात्रात वाघ मृतावस्थेत आढळून आला. त्यांनी लगेच या घटनेची माहिती वनविभागाला दिली.

माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भीमणी नदीचे पात्र गाठले. मात्र, तोपर्यंत पाण्याचा विसर्ग वाढल्याने मृत वाघ समोर वाहून गेला. त्यामुळे वनविभागाने मृत वाघाचा शोध घेतला. मात्र, पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने वाघ पुढे वाहून गेला.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments