HomeBreaking News८३ लक्ष रुपयांचा घनकचरा टेंडर घोटाळा : विरोधी नगरसेवकांचा मुख्याधिकारी, नगराध्यक्षावर गंभीर...

८३ लक्ष रुपयांचा घनकचरा टेंडर घोटाळा : विरोधी नगरसेवकांचा मुख्याधिकारी, नगराध्यक्षावर गंभीर आरोप

८३ लक्ष रुपयांचा घनकचरा टेंडर घोटाळा : विरोधी नगरसेवकांचा मुख्याधिकारी, नगराध्यक्षावर गंभीर आरोप

नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली तक्रार ; न्यायालयात जाण्याचा दिला इशारा

 

प्रतिनिधी पोंभूर्णा :-१५ सप्टेंबर. पोंभूर्णा नगर पंचायत अंतर्गत जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान सन २५-२६ योजने अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनाचे प्रस्तावित अंदाजपत्रकीय किंमत ८३ लक्ष ५१ हजार ८५० रुपयांच्या कामाबाबत सभेत विषय नसतानाही खोट्या व गैरमार्गाने ठराव सर्वानुमते मंजुर असल्याचा खोटा ठराव लिहून टेंडर घोटाळा मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनी केल्याचा गंभीर आरोप विरोधी नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्याकडे केलेल्या तक्रारीतून केली आहे. घनकचरा निविदा घोटाळ्याच्या गैरव्यवहाराबाबत न्यायलयात याचिका दाखल करणार असल्याचे विरोधी पक्षनेता आशिष कावटवार, नगरसेवक गणेश वासलवार,अतुल वाकडे,अभिषेक बद्दलवार, नंदकिशोर बुरांडे, रामेश्वरी वासलवार, रिनाताई उराडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

१४ मे रोजीच्या सर्वसाधारण सभेत विविध विकास कामांमध्ये घनकचरा व्यवस्थापनासंबंधी विषयाची निवड करण्यात आली. विविध विकास कामांमध्ये कोणत्याही विकास कामाची निवड करता येते. त्यालाच अनुसरून नियमानुसार प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर सदरची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. यात काहीच चुकीचे किंवा गैर नाही. विरोधकांचे आरोप निराधार व तथ्यहीन आहेत.

  – सुलभा पिपरे नगराध्यक्ष,                       नगरपंचायत, पोंभुर्णा.                

पोंभूर्णा नगर पंचायत मधील १४ मे २०२५ रोजीच्या सर्वसाधारण सभेच्या विषय नोटीस व टिपणी मध्ये विषय अजेंड्यावर नसतानाही व सभेत या कुठल्याही विषयावर चर्चा झालीच नसल्याने विविध विकास कामांच्या विषयात छुप्या मार्गाने सर्वानुमते ठराव मंजुर करित असल्याचे दाखवत ठराव बुकात नोंद करून जिल्हाधिकारी व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाची मान्यता घेत घनकचारा व्यवस्थापनाचा टेंडर काढण्यात आला आहे.

नगर पंचायतच्या १४ मे २०२५ ला झालेल्या सर्वसाधारण सभेचा संपूर्ण इतिवृत्त पुढील सभा दिनांक १ जुलै २०२५ च्या सभेतील विषय एक मध्ये मागील सभेचा इतिवृत्त वाचन करून कायम करायला हरकत नसावी असा विषय असताना १ जुलै च्या सभेतील इतिवृत्त वाचण्यात जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजने अंतर्गत घनकचारा व्यवस्थापनेचा ८३ लक्ष ५१ हजार ८५० रुपयांच्या कामाबाबत वाचनच करण्यात आलेले नाही. त्यामुळे तो विषय कायम कसा करण्यात आला असा सवाल विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी केला आहे.तसा पुरावा म्हणून १ जुलैच्या सभेची व्हिडीओ वाईस रेकॉर्डिंग नगरसेवकांकडे असल्याचे विरोधी नगरसेवकांकडून सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मध्ये नगर पंचायतने निविदा प्रक्रिया पूर्ण करण्या अगोदर सभेची मंजूरी घ्यावी लागते. असे असतानाही पोंभूर्णा नगर पंचायतच्या १४ मे २०२५ च्या सभेत हा विषय अजेंड्यावर नसतांनाही पडद्यामागे ठराव प्रोसिडिंगवर विविध विकास कामाची निवड करणे ह्या विषयामध्ये लिहून सर्वानुमते मंजूर दाखवण्याचा बोगसपणा प्रशासनाने व सभाध्यक्षाने केला कसा ? आणि कशासाठी ? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारीचे निवेदन दिले आहे. या घनकचरा संकलन टेंडर घोटाळ्या बाबत न्यायालयात याचिका टाकून गैरमार्गाने कृत्य करणाऱ्या मुख्याधिकारी, नगराध्यक्ष,व संबंधित पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्ष गटनेता आशिष कावटवार,नगरसेवक गणेश वासलवार,अतुल वाकडे,अभिषेक बद्दलवार,नंदकिशोर बुरांडे, रामेश्वरी वासलवार, रिनाताई उराडे यांनी आयोजित पत्रपरिषदेतून केला आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments