HomeBreaking Newsराज्य राखीव बल गट तर्फे उद्या आरोग्य तपासणी शिबिर

राज्य राखीव बल गट तर्फे उद्या आरोग्य तपासणी शिबिर

राज्य राखीव बल गट तर्फे उद्या आरोग्य तपासणी शिबिर कोरेगाव

महेश वासेकर कुनघाडा ; राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 13 विसोरा येथे शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर व डॉ.बाबासाहेब आंबेडकर युवा स्पेशालिटी यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन २८ मे ला सकाळी १०.०० वाजता केलेले आहे.

सदर शिबिरामध्ये मेडिसिन स्त्रीरोग तज्ञ बालरोग तज्ञ अस्थिरोग तज्ञ , सर्जरी नेत्ररोग तज्ञ कान, नाक, घसा, त्वचारोग, श्वसन रोग  आदी विविध बिमारीचे तज्ञ व अनुभवी डॉक्टर्स कडून शिबिरामध्ये तपासणी व उपचार करणार आहेत. देसाईगंज तालुक्यात राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 13  हे नेहमीच जनतेच्या विकासासाठी व आरोग्यासाठी तत्पर सेवा देत आहेत. या आरोग्य शिबिराचा विसोरा सह परिसरातील गावातील जास्तीत जास्त जनतेनी लाभ घ्यावा असे राज्य राखीव बल गट क्रमांक 13 चे समादेशक अमोल गायकवाड यांनी आवाहन केले आहे.

आरोग्य शिबिराला सर्व पोलिस अधिकारी, पोलिस अंमलदार, गावातील सरपंच कमेटी, अशा वर्कर, अंगणवाडी सेविका आदींचा विशेष सहकार्य लाभणार आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments