सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या महिलांवर वाघाचा हल्ला ; महिला ठार
मुल तालुक्यातील टोलेवाही, भगवानपूर येथील घटना.
लोकवाद मुल : मुल तालुक्या अंतर्गत येणाऱ्या टोलेवाही ते भगवानपूर रोड लगत पोल्ट्री फार्म जवळ आज, २७/५ मंगळवार ला सकाळी 8:00 वा. चे दरम्यान सरपन गोळा करण्याकरिता गेलेल्या संजवना संजय मॅकलवार वय, 42 वर्ष राहणार चारोली या महिलेवर दब्बा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना घडली आहे.
हि घटना कपार्टमेंट क्रमांक. 524 मध्ये झाली. या घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली. यावेळी ग्रामस्थानी घटनास्थळाकडे धाव घेतली. तेव्हा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात जंगलात पडून होता. वनपरीक्षेत्र मुल चे अधिकारी व चिरोली चे वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. व पंचनामा केल्यानंतर प्रेत शवविच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय मुल येथे नेण्यात आले. त्यावेळी पोलिस चमू उपस्थित होती.
वाघ- मानव संघर्षाच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. यात मानवाचा वाघाच्या हल्याने नाहक बळी जात असून मानव आणि वना करिता वाघ या दोन्ही बाबी महत्वाच्या असताना वन विभागाचे समोर मोठे आवाहन निर्माण झाले आहे. मात्र दिवसा गणिक वाघ्या हल्ल्याच्या घटना वाढत जात असल्याने महत्वाच्या पैलू मानवाच्या मृत्यूच्या मृत्यूला जबाबदार कोण ? हा मोठा प्रश्न आहे. यावर ठोस उपाययोजना करणे अतिशय गरजेचे आहे. अन्यथा उद्या चालून वाघ गावात येतील आणि नागरिकांनी रहायचे कुठे अशा गंभीर प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहणार नाही ?
सध्या शाळांना सुट्या असल्याने मुलांची ये जा नसली तरी शाळा चालू होताच पुनर्वसन भगवानपूर गावातील अनेक छोटी मोठी मुले विद्यार्जन करिता चिरोली येथे पायदळ व सायकल ने ये – जा करीत असतात. त्यामुळे भविष्यात मोठा अनर्थ होण्याचे नाकारता येणार नसून लागलीच उपाय करणे आवश्यक आहे.







