Homeगडचिरोलीएटापल्ली तालुक्यातील पुन्नूर फाटा ते पेठा फाटा खराब रस्ता झाला दुरुस्त

एटापल्ली तालुक्यातील पुन्नूर फाटा ते पेठा फाटा खराब रस्ता झाला दुरुस्त

एटापल्ली तालुक्यातील पुन्नूर फाटा ते पेठा फाटा खराब रस्ता झाला दुरुस्त 

एटापल्ली तालुक्यातील पुन्नूर फाटा ते पेठा फाटा खराब रस्ता झाला दुरुस्त करून मिळाला म्हणून पुन्नूर गावातील ग्रामस्थ  आपली  समस्या मांडताना.

प्रतिनिधी गडचिरोली, एटापल्ली  तालुक्याच्या ठिकाणी जात  असलेला  पुन्नूर फाटा ते पेठा फाटा प्रयत्न अंदाजे 2km चा रस्तावर डांबरीकरण करण्यात आला नसल्याने प्रवास करताना मोठ्या अडचणी निर्माण होत आहे. परिणामी अनेक अपघात घडत आहे. सदर रस्त्यावर तत्काळ डांबरीकरण करण्यात यावा या मागणीला घेऊन पुन्नूर गावातील गाव पाटील विकास  झोरे व इतर ग्रामस्थांनी  कसनसूर पोलिस ठाणे मार्फत मा.जिल्हाधिकारी यांचेकडे विनंती केली आहे.

सदर मागणीची दाखल घेत मा.जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी संबंधित विभागाचे अधिकारी तथा रस्त्याचे काम हाती  घेतलेल्या ठेकेदारांना रस्ता लवकरात लवकर  दुरुस्त  करून त्यावर तत्काळ डांबरीकरण करण्यात यावे तसेच ग्रामस्थांच्या होणाऱ्या अडचणी दूर कराव्यात असे सूचना दिल्या आहेत.

त्याच प्रमाणे पुन्नूर गावात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या असून जल जीवन मिशन योजने अंतर्गत करण्यात आलेल्या पाईपलाइन काम निकृष्ठ दर्जाचे झाले असल्याने त्याची दुरुस्ती करण्यात यावी याबाबतच्या सूचनी देण्यात आलेल्या आहे. सदरची दोन्ही समस्या मा.जिल्हाधिकारी  लवकरात लवकर सोडवतील अशी आशा पुन्नूर गावातील ग्रामस्थांनी केलेली आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments