Homeमुलबल्लारपूर पब्लिक स्कूल मूल येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा...

बल्लारपूर पब्लिक स्कूल मूल येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

बल्लारपूर पब्लिक स्कूल मूल येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

प्रतिनिधी येजगांव, बल्लारपूर पब्लिक स्कूल मुल येथे मोठ्या उत्साहात 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.

त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिक्षण प्रसारक मंडळ मूल चे अध्यक्ष ऍड अनिल वैरागडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला तसेच मुख्य अतिथी म्हणून सचिव  शशिकांत धर्माधिकारी शिक्षण प्रसारक मंडळ मूल तसेच विशेष अतिथी म्हणून श्री हंसराज गजभिये उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती बल्लारपूर पब्लिक स्कूल मूल,  तसेच शाळेचे प्राचार्य श्री विनोद बोलीवार सह विद्यार्थी प्रतिनिधी कुमार अंश तेलसे विद्यार्थिनी प्रतिनिधी कशिश रामटेके कार्यक्रमात उपस्थित होते व कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण कुमारी दुर्गा कोटगले शैक्षणिक प्रभारी बल्लारपूर पब्लिक स्कूल मूल, व शाळेचे प्राचार्य विनोद यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना प्रजासत्ताक दिनाबद्दल मार्गदर्शन करून प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व पटवून दिले. त्यात उपस्थित सर्व मान्यवरांनी मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त केले व स्पर्धेमध्ये प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांना शिल्ड व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्य विविध प्रकारचे नृत्य सादर करून पालकाना व उपस्थित विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले असून उत्कृष्ट विद्यार्थी, विद्यार्थिनी ना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी तोशी जयस्वाल सास्कृतिक प्रभारी हिने केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करिष्मा लेनगुरे शाळेतील शिक्षिका हिने केले कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता शाळेचे प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी अथक परिश्रम घेतले खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या राष्ट्रागानाने करण्यात आली.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments