न्यू माऊंट कॉन्व्हेन्ट येथील चिमुकल्यांचा मनमोहक नृत्य
प्रेक्षक मंत्रमुग्ध तर नृत्यात व्दितीय क्रमांक
संस्थापकानी केले अभिनंदन
चामोर्शी प्रतिनिधी, नगर पंचायत चामोर्शीच्या वतीने दरवर्षी नगर पंचायत प्रांगणात तालुक्यातील सर्व शाळा ना आमंत्रित करून शाळांतील विद्यार्थ्यानं कडून विविध सामाजिक शौकक्षणीक, कला गुणांना वाव मिळावा या उदांत हेतूने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात येते. यात प्रामुख्याने लहानग्या मुलांपासून ते अगदी कॉलेज मधील मुलांचा प्रामुख्याने समावेश असते.
यात विविध गट अंतर्गत स्पर्धा घेण्यात येत असून त्यात उत्कृष्ठ नृत्याचे सदरी कारण करणाऱ्यास शिड, प्रमाण तथा विशेष बक्षीस वितरण करण्यात येते. त्या नुसार चामोर्शी येथिल मांर्कांड पुरा वॉर्डातील न्यू माऊंट कॉन्व्हेन्ट च्या छोटया मुलांनी सहभाग नोंदवून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत महाराष्ट्रातील खास करून संस्कृती चां उत्कृष्ठ नमुना सादर करून तालुक्यात व्दितीय क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या या यशाबद्दल शाळेचे संस्थापक दुर्योधन घोंगडे तथा तुषार कर्णे, यासह पालकांनी अभिनंदन केले आहे.







