जि. प. उ. प्रा. केंद्र शाळा गट्टा येथे ६७वा प्रजासत्ताक दिन उत्साह साजरा
गडचिरोली प्रतिनिधी lokwad.in , एटापल्ली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा येथे भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साह साजरा करण्यात आला. रविवार दिनांक 26 जानेवारी 2025 या दिवशी केंद्रशाळा गट्टा शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.माजी सदस्य गडचिरोली सैनुजी गोटा , गावाचे पोलीस पाटील कन्नाजी गोटा, ग्रामसेवक माननीय मेश्राम, सरपंच पूनम ताई लेकामी ,शाळा अध्यक्ष गोविंद शहा ,शाळा उपाध्यक्ष दिलीप दाहा गावकर शाळेतील शिक्षक व पालक यांनी विशेष उपस्थिती दर्शविली .तसेच शाळेमध्ये ध्वजारोहण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या नृत्य, भाषण , कवायत संचालन उत्कृष्ट पद्धतीने पार पडले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन अगदी चांगल्या पद्धतीने आयोजित केले गेले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. बेडके यांचे या कार्यक्रमासाठी मोलाचे मार्गदर्शन लाभले. शाळेतील विद्यार्थ्यांनी अगदी इंग्रजी भाषेत अप्रतिम शब्दात सूत्रसंचालन केले .
प्रमुख पाहुणे श्री सैनुजी गोटा यांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व समजावून सांगितले. शाळेची प्रगती बघून मुख्याध्यापकांचे कौतुक करण्यात आले . या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक व विद्यार्थी यांचे मोलाचे योगदान लाभले.
शाळेतील सर्व विद्यार्थी त्यांचे पालक यांनी या शुभ दिनी कार्यक्रमाला महत्त्वाची आणि मोठी उपस्थिती दर्शविली. तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री बेडके यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. यावेळी देशभक्तीपर घोषवाक्यांनी परिसर दुमदुमून गेले. बाळ गोपाळांनी या कार्यक्रमात विविध राष्ट्रपुरुषांच्या भूमिका सादर करून वाहवाह मिळविली. पालक वर्गाने टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले.







