HomeBreaking Newsसर्व सोयीयुक्त रुग्णवाहिकाचे मान. आम. सुधीरभाऊ यांच्या हस्ते लोकार्पण थाटात

सर्व सोयीयुक्त रुग्णवाहिकाचे मान. आम. सुधीरभाऊ यांच्या हस्ते लोकार्पण थाटात

सर्व सोयीयुक्त रुग्णवाहिकाचे मान. आम. सुधीरभाऊ यांच्या हस्ते लोकार्पण थाटात

स्वर्गीय विनोद चीतालीया यांच्या स्मृती प्रित्यर्थ चीतालिया कुटुंबाकडून जलतरण संघटनेला भेट

प्रतिनिधी मुल lokwad.in

पैसा अनेक लोक कमवतात कोणी कमी कोणी जास्त तर कहिक अती जास्त मात्र यात काहीकच लोकांमध्ये सामाजिक भावना असते. ज्या मातीतून समाजातून परिस्थितीतून आलो त्याची जान ठेवत समाजिक समस्याचे निराकरणासाठी काही देणे आहे या भावनेने काही समाज सेवक पुढे येतात दान करतात त्यातील एक म्हणजे चीतालिया कुटुंब स्वर्गीय विनोद चितालिया यांच्या स्मृती प्रीत्यर्थ श्रीमती भद्रादेवी विनोद चितालिया, विरल विनोद चितालिया, व मीलान विनोद चितालिया यांच्या सौजण्यातून मिळालेल्या सर्वंसोयीयुक्त असलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण जलतरण संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मुल येथे आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले, चितालिया परिवाराच्या वतीने विराल चितालिया हे स्वतः आज या सोहळ्याला उपस्थित होते हे विशेष.

या प्रसंगी अमोल जाधव मुंबई, माजी जि.प अध्यक्ष संध्याताई गुरनुले, जलतरण संघटनेचे अध्यक्ष तथा माजी नप. उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, धनश्री पतसंस्थेचे अध्यक्ष अजय गोगुलवार , सामाजिक कार्यकर्ते तथा जलतरण संघटना सचिव किशोर कापगते, सामजिक कार्यकर्ता मंगेश पोटवार आदी लोक मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात वंदनीय भारत मातेच्या पूजनाने व महाराष्ट्र गीताने झाली , आमदार सुधीर मुनगंटीवार व विरल चितालिया यांनी सर्व मान्यवर, जलतरण संघटनेचे कार्यकर्ते व जनतेच्या उपस्थितीत फीत कापून रुग्णवाहिकेचे लोकार्पण केले, आमदार मुनगंटीवार यांनी आपल्या मार्गदर्शनात संस्थेच्या कार्याचे कौतुक केले सोबतच संस्थेला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या प्रसंगी विरल चितालिया यांचे पण मार्गदर्शन झाले त्यांनी आपल्या मार्गदर्शनात आपल्या वडिलांनी महाराष्ट्रातील छोट्या छोट्या भागातून व्यवसायाला सुरुवात केली जी आज देशातच नव्हे तर देशाबाहेर मोठ्या उद्योगाच्या रूपाने सुरू आहे. वडिलांनी आम्हाला जीवित असतानाच सांगितले की महाराष्ट्रातील भूमीला समाजाला जर काही देणे लागले तर ते मनमोकळ्या पणाने द्या आणि म्हणुन आम्ही ही छोटीशी भेट आपणास रुग्णसेवें करिता प्रदान करीत आहोत पुढे आणखी सेवेची संधी दिली तर निश्चितच आम्ही तत्पर असू असे आश्वासनही दिले, तर संस्थेचे सचिव किशोरभाऊ कापगते यांनी आपल्या प्रास्तविक भाषणात संस्थेच्या आजपर्यंतच्या केलेल्या सामाजिक कार्याची माहिती देत आमदार मुनगंटीवार व चितालिया यांचे आभार मानले, संस्थेचे अध्यक्ष नंदकिशोर रणदिवे यांनी उपस्थितांचे आभार मानले तर माजी नप. उपाधक्ष्य प्रविन मोहूर्ले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, जलतरण संघटनेचे संजय चिंतावार, मनोज रणदिवे, अरुण खोब्रागडे,रामदास उरकुडे,प्रमोद कोकुलवार, प्रवीण मोहूर्ले, संजय जीवतोडे, संजय मारकवार, दुर्वास घोंगडे, हितेश निकोडे, नवनाथ शेंडे, प्रशांत मुत्यारपवार, नितीन गेडाम,राजेश सूत्रपवार, चौरसिया, निलेश माहोरे, नवीन गुरणानी, आशिष आगडे, तेजस रणदिवे, क्रिश अंबुरतीवार,सक्षम बोकडे सह आदी जलतरण संघटना कार्यकर्ते व अनेक सामाजिक कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments