*मुंबईचे अधिकारी एटापल्ली च्या दुर्गम भागातील शाळा भेटीला*
*एटापल्ली:-एटापल्ली ही तालुका गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम व नक्सालग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो,या भागातील शिक्षण व्यवस्था मागासलेला आहे असे मानला जातो पण याच तालुक्यातील मागील वर्षी एका शिक्षकाला राष्ट्रीय पातळीवर शिक्षक पुरस्कार व एका शिक्षकाला राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला होता,यावरून गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात शिक्षण व्यवस्था मजबूत झाल्याचे सिद्ध होताना दिसून येत आहे, अशातच दिनांक 9 डिसेंबर 2024 ला नेताजी सुभाषचंद्र बोस आवासिय विद्यालय गट्टा व कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय एटापल्ली या शाळेना मा, संजय डोरलीकर उपसंचालक,महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद मुंबई यांनी भेट दिले,शाळेत सुरू असलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेतले,व विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासून पाहिले,इयत्ता 1 ली वर्गातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहून आश्चर्य व्यक्त केले,या दोन शाळेतील शालेय प्रशासन,वर्ग अध्यापन व्यवस्था,शालेय सूक्ष्म नियोजन, स्वछता,शालेय परिसर,शालेय गुणवत्ता, शिक्षकांचे कर्तव्य,शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या कर्तव्य,या विषयावर सखोल मंथन करून मोलाचे मार्गदर्शन केले,या अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागातील शालेय प्रगती पाहून शाळेतील शिक्षकांच्या प्रशंसा केले,तसेच या शाळेतील समस्या दूर करून विविध भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल असे ते म्हणाले,
या भेटीच्या वेळी सोबत मा.नाकडे उपशिक्षणाधिकारी श्री, हृषीकेश बुरडकर गटशिक्षणाधिकारी श्री,भरडकर अभियंता, मा,निखिल कुमरे साहेब शिक्षण विस्तार अधिकारी, अशोककुमार कोवे गट समन्वयक,श्री,पिल्ले अभियंता मा, किशोर खोब्रागडे साधन व्यक्ती श्री,एम,सी,बेडके मुख्याध्यापक,कु,शिंपी मुख्याध्यापक व शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते,*







