HomeBreaking Newsपोंभूर्णा शहरात श्री संताजी महाराज यांची ४०० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

पोंभूर्णा शहरात श्री संताजी महाराज यांची ४०० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

पोंभूर्णा शहरात श्री संताजी महाराज यांची ४०० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी 

-“श्री संताजी जगनाडे महाराज यांचे विचार आत्मसात करून युवकांनी समाज सुधारणेसाठी हातभार लावावा – डॉ. नैताम”

मोफत रक्त तपासणी शिबिर, प्रबोधन कार्यक्रम व रॅलीचे करण्यात आले आयोजन 

लोकवाद प्रतिनिधी (८ नोव्हें.)

पोंभूर्णा : श्री संताजी जगनाडे महाराज यांचे विचार आत्मसात करून युवकांनी समाज सुधारणेसाठी हातभार लावावा असे मत डॉ. नैताम यांनी पोंभूर्णा शहरात संतश्रेष्ठ श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या ४०० व्या जयंती निमित्ताने आयोजित प्रबोधन कार्यक्रमात व्यक्त केले.

संतश्रेष्ठ श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या ४०० व्या जयंती निमित्ताने पोंभूर्णा शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत मोफत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सध्याचे जीवन वर्दळीचे झाले आहे. त्यात अनेक आजार भेडसावत आहे.

आजाराची ओळख व्हावी म्हणून रक्ताच्या महागड्या तपासण्या कराव्या लागतात.श्री संताजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून तेली समाज बांधव तथा नागरिकांना मोफत रक्ताची तपासणी करता यावी म्हणून जयंती निमित्ताने पोंभूर्णा शहरात मोफत रक्त तपासणी चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.शिबिरात तीनशेहून अधिक नागरिकांनी रक्त तपासणी करून घेतली.संध्याकाळी शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. यात मोठ्या संख्येने महिला, पुरुष व तरुणांची हजारोच्या संख्येने उपस्थिती होती. रॅली नंतर प्रबोधन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

प्रबोधन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पोंभूर्णा नगरपंचायतच्या नगराध्यक्ष सुलभा पिपरे, डॉ.नागेश नैताम,तेली समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष गुरूदास पिपरे, नगरसेवक नंदकिशोर बुरांडे,जेष्ठ नागरिक अशोक सातपुते,माजी नगरसेवक मोहन चलाख,तेली समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते ईश्वर नैताम,भाऊजी बुरांडे, शंकर सातपुते, पुंडलिक सातपुते, प्रभाकर बोबाटे, काशिनाथ मोगरकर, राजेश्वर मोंगरकर, किशोर देउरमल्ले, देवराव दुधबळे, देवराव नैताम,मोहन दुधबले, भैयाजी बुरांडे, अश्विनी चलाख, अशोक सातपुते, दासुजी देवतळे ,नरेंद्र धोडरे,राजू धोडरे, कविता गव्हारे, किशोर धोडरे, सुमन पीपरे, नीलकंठ सातपुते, सविता धोडरे सह आदी समाज बांधव तथा गावातील ज्येष्ठ व प्रतिष्ठित महिला पुरुष मोठ्या संख्येनी उपस्थित होते .

मानवतेची शिकवण देणारे संतश्रेष्ठ श्री संताजी जगनाडे महाराज यांचे जयंती साजरी करत असताना त्यांचे विचार आत्मसात करून समाज सुधारणेला हातभार लावावा असे विचार डॉ.नैताम यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात सांगितले , अशोक जी सातपुते यांनी सामाजिक प्रबोधना द्वारे तेली समाज विकसित व्हावा असे मार्गदर्शन केले. तर सुलभा ताई पिपरे यांनी संताजी जगनाडे महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकला.

या कार्यक्रमा चे संचालन विनोद धोडरे यांनी तर आभार गुरूदास पिपरे यांनी मानले.

सदर कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता राकेश देवताळे, जगन कोहळे,दिपक कूनघाडकर, सह शहरातील युवा कार्यकर्ते व नागरिकांनी अथक परिश्रम घेतले

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments