ट्रक चालकाने सायकल स्वराचा केला चेंदामेंदा
चामोर्शी शहरातील आष्टी वळण मार्गावरील घटना ; अपघातात मलेश कनकुटलावार जागीच ठार
चामोर्शी प्रतिनिधी; शहरातील आष्टी वळण मार्गावर आष्टी वरून गडचिरोली जाणाऱ्या ट्रक चालकाने सायकल वर स्वार असलेल्या मलेश भिमया कनकुटलावार या वक्तीला धडक दिल्याने ट्रकचा चाकाखाली येऊन त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज ता. 8/12 ला सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास घडली आहे.
घटनेची माहिती मिळताच चामोर्शि पोलिस पोलिस चमू यांचे कडून घटना स्थळी दाखल होत पंचनामा केला व प्रेत शव विच्छेदन करण्याकरिता उपजिल्हा रुग्णालय चामोर्षी येथे पाठविण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास चामोर्शी पोलिस करीत आहे.
मलेस कनकुटलावार हे एका खाजगी राईस मिल मध्ये चौकीदार या पदावर कामावर होते सकाळी जेवण करून आपल्या कर्तव्यावर जात असताना सकाळच्या सुमारास सदर घटना घडली वयस्क असून सुधा ते कुटुंबाचे आधारवड होते त्यांच्या जाण्याने शहरात वॉर्डात हळहळ होत आहे. त्यांचे पश्चात पत्नी, मुलगा,सून, मुली, नातवंडं असा बराच आप्त परिवार आहे.







