HomeBreaking Newsमुल शहरात वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का

मुल शहरात वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का

मुल शहरात वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का

वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष डेविड खोब्रागडे यांचा काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश

संतोष सिंह रावत यांच्या नेतृत्वावर विश्वास

*मुल:-* वंचित बहुजन आघाडीचे मुल शहर अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते डेविड खोब्रागडे यांनी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर व संतोषसिंहरावत यांच्या सामाजिक कार्यावर  विश्वास ठेवून हजारोंच्या संख्येने उपस्थित जनसमुदायासमोर काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केल्याने मोठा धक्का वंचित आघाडीला बसणार आहे.

ऐन निवडणुकीच्या धामधुमीत डेव्हिड खोब्रागडे यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केल्यामुळे निश्चितच मुल तालुक्यात याचा मोठा धक्का वंचित आघाडीला मुल शहरात पडणार असून याचा लाभ काँग्रेस पक्षाला होणार अशी आशा काँग्रेस नेत्यांना आहे.  डेव्हिड खोब्रागडे यांचे सामाजिक कार्य उत्तम असून तालुक्यातील बौद्ध समाजामध्ये त्यांची प्रतिष्ठा आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार संतोष सिंह रावत हे एक उत्तम नेतृत्व असून त्यांच्या नेतृत्वाचा लहानपणापासूनच माझ्यावर प्रभाव आहे आणि आजपर्यंत त्यांनी केलेले कार्य हे माझ्यासाठी प्रेरणादायी असल्यामुळेच मी संतोष सिंह रावत यांच्या कार्यावर विश्वास ठेवत संतोष भाऊंच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षात प्रवेश केला असे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले. कांग्रेस पक्षाची विचारधारा व पक्ष संघटन वाढविण्याकरिता मी तन-मन-धनाने काम करेल आणि या निवडणुकीत महाविकास आघाडीतील उमेदवार संतोष भाऊं यांना निवडून आणण्यासाठी मोठ्या ताकदीने मैदानात उतरणार याची ग्वाही त्यांनी दिली.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments