HomeBreaking Newsवन विभागाने रेतीचे दोन ट्रॅक्टर केले जप्त

वन विभागाने रेतीचे दोन ट्रॅक्टर केले जप्त

वन विभागाने रेतीचे दोन ट्रॅक्टर केले जप्त 

वन विभाग प्रादेशिकची कारवाई

चिमूर :- दिनांक. 28/10/2024 शंकरपुर उपवनक्षेत्राअंतर्गत नियतक्षेत्र शंकरपुर मधील राखीव वन कक्ष क्रमांक 46 मध्ये अवैध्यरित्या रेती उत्खनन व वाहतुक प्रकरणी वनाधिकाऱ्यांनी दोन ट्रॅक्टर रेतीसह जप्त केले.

सदर घटनेची हकीकत अशी की, शंकरपुर नितयक्षेत्रात वनाधिकाऱ्यांनी गस्ती दरम्यान ट्रॅक्टरचा जंगलात कर्कश असा आवाज येत असल्याने त्या भागात गस्तीवर गेले असता तिथे दोन ट्रॅक्टर रेतीने भरलेले दिसून आले. यावेळी पाहणी केली असता त्या विना नंबरचे ट्रॅक्टर व बिना नंबरचे ट्रॉलीसह 100 घनफुट रेतीसह व दुसरे बिना नंबरचे ट्रॅक्टर टॉलीसह 80 घनफुट रेतीसह व फावडे घमेलेसह आढळून आले. सदर ट्रॅक्टर मालकावावत चौकशी केली असता गंगाधर दिवाकर दडवे, रा. शंकरपुर वय 40 वर्ष यांचे मालकीचे असल्याचे निर्देशनास आले. त्याचेसह दोन ट्रैक्टर सोबत आरोपी ड्रायव्हर उपस्थित होते. ।) निखील मंगरु सहारे, रा. शंकरपुर वय 24 वर्षे आरोपी ड्रायव्हर नंबर 2) लखन श्रीराम सहारे, रा. शंकरपुर वय 24 वर्ष 3) लखन शालीक चौधरी, रा. शंकरपुर वय 26 वर्ष 4) अशोक लक्ष्मण घरत, रा शंकरपुर वय 27 वर्ष 5) जिवन सुधाकर दडमल, रा. शंकरपुर वय 24 वर्ष 6) लक्ष्मण जानवा रंदई, रा. शंकरपुर वय 26 वर्ष 7) जगदीश रवी सहारे, रा. शंकरपुर वय 24 वर्ष 8) सुमीत वाल्मीक मेश्राम, रा. शंकरपुर वय 20 वर्ष 9) संदीप जोधरु सावसाकडे, रा. शंकरपुर वय 24 वर्ष सर्व राहणार शंकरपुर यांचेवर भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26(1) (G), 41 व 42(2) नुसार वनगुन्हा क्रमांक. 09147/ 228661/2024 दिनांक 28/10/2024 अन्वये गुन्हा नोंद करुन दोन्ही ट्रॅक्टर एकूण 180 घनफुट रेतीसह बारा प्लॉस्टिकचे टोपले, नऊ लोखंडी फावडे व एक लोखंडी सब्बल जप्त करुन दोन्ही ट्रॅक्टर वनपरिक्षेत्र कार्यालय चिमूर येथे जमा केले.

सदर प्रकरणाचा तपास किशोर देऊरकर, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशीक) चिमूर यांचे मार्गदर्शनात वन विभाग हे करीत असून कार्यवाही दरम्यान उध्दव लोखंडे, घुगरे, क्षेत्र सहाय्यक मुरपार, राजेंद्र मेश्राम क्षेत्र सहाय्यक चिमुर, राहुल सोमेश्वर भुरले वनरक्षक शंकरपुर, विशाल सोनुने वनरक्षक, कालीदास गायकवाड वनरक्षक, रुपेश केदार वनरक्षक, अक्षय मेश्राम वनरक्षक, प्रदिप ढोणे हे हजर होते.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments