HomeBreaking Newsविहिरीतून पाणी काढतांना तोल गेल्याने शेतकऱ्याचा बुडून मृत्यू

विहिरीतून पाणी काढतांना तोल गेल्याने शेतकऱ्याचा बुडून मृत्यू

पोंभूर्णा तालुक्यातील डोंगर हळदी माल येथील घटना 

पोंभूर्णा :- तालुक्यातील डोंगर हळदी माल येथील शेतकरी घराच्या मागे असलेल्या विहीरीतून पाणी काढतांना विहीरीत तोल गेल्याने विहीरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना दि.३१ आक्टोंबरला सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. गणपत मार्कंडी लेनगुरे वय ६५ वर्ष असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.

रोजच्या प्रमाणे गणपत लेनगुरे घरचे बकऱ्या धुण्यासाठी घराच्या मागे असलेल्या तोंडी नसलेल्या विहीरीतून पाणी काढतांना अचानक तोल गेल्याने ते खोल विहीरीत पडले.घटनेची माहिती मिळताच जवळपास असलेल्या लोकांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र यश आले नाही.खोल पाण्यात बुडूल्याने त्याचा मृत्यू झाला‌.पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.त्याचे शवविच्छेदन पोंभूर्णा येथील ग्रामीण रुग्णालय येथे करण्यात आले‌.उमरी पोतदार पोलिस स्टेशनचे ठाणेदार राहुल गुहे यांच्या मार्गदर्शनात प्राथमिक तपास सहाय्यक फौजदार नरेंद्र खोब्रागडे करीत आहेत.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा,सून,मुली, आणि नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे.दिवाळीच्या सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांच्या आकस्मीक मृत्यूने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

विहिरीतून पाणी काढतांना तोल गेल्याने शेतकऱ्याचा बुडून मृत्यू

-डोंगर हळदी माल येथील घटना

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments