येसगाव येथे क्रिकेट चा आगळा वेगळा सामना
विवाहित अविवाहितातील सामन्याचे सर्वत्र कौतुक
प्रतिनिधी येसगावं , आज ता. 2 नोव्हेंबर ला दिवाळी सणाच्या निमित्ताने मूल तालुक्यातील येसगाव येथे क्रिकेट च्या सामनाचे आयोजन करण्यात आले मात्र सदर क्रिकेट सामना आगळा वेगळा पद्धतीचं असल्याने तालुक्यात मोठा चर्चेचा विषय झाला आहे.
सविस्तर वृत्त असे की, क्रिकेटचे सामने सामान्य बाब आहे. महिलांचे , मुलां मुलींचे , व पुरुषांचे सामनेही आपण नेहमीच बघतो मात्र मुल तालुक्यातील येसगाव या छोट्याशा गावातील युवकांना दिवाळी सणाच्या मुहूर्तावर आलेली कल्पना मोठा चर्चेचा विषय बनली आहे. या क्रिकेटच्या सामन्यामध्ये विवाहित आणि अविवाहित तरुणांमध्ये घेण्यात आलेल्या आगळ्या वेगळ्या प्रकाराची सामन्याच्या लढतिची चर्चा सध्या गाव व गाव परिसरातच नव्हे तर तालुक्यातच जणू चर्चेचा विषय बनली आहे. या कल्पनेचे आणि सामन्याचे सर्वत्र मोठे कौतुक होत असून आगळ्या वेगळा सामना बघण्यास गाव व परिसरातील अनेक नागरिकांत उत्सुकता होती.
सदर सामन्यात विवाहित संघाचे कॅप्टन विजय गुरणुले तर अविवाहित संघाचे कॅप्टन महेश गेडाम होते. सामन्याचे आयोजन करण्यासाठी अशपाक सय्यद, मोहन वाढई, धर्मपाल घोंगडे सह अनेक युवकांनी नागरिकांनी परिश्रम घेत सहकार्य केले.







