📰 भारतीय जनता पक्षातर्फे मुल तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
मुल (प्रतिनिधी):
नुकताच दहावीच्या सीबीएसई बोर्डाचा निकाल जाहीर झाला असून मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन करत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा घरी जाऊन सत्कार करण्यात आला.
यामध्ये कुमारी अवनी सुहास पुपलवार हिने ९७.६० टक्के गुण मिळवत मुल तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या यशाबद्दल भाजप पदाधिकाऱ्यांनी तिच्या निवासस्थानी भेट देत पुष्पगुच्छ, भेटवस्तू व पेढे देऊन अभिनंदन केले.
या सत्कार प्रसंगी भाजपचे मुल तालुका अध्यक्ष चंदू मारगोनवार, शहर अध्यक्ष प्रवीण मोहूर्ले, नेत्या सौ. किरण कापगते, माजी नगरसेवक मिलिंद खोब्रागडे, नगरसेविका सौ. प्राची आक्केवार, सौ. अश्विनी निकोडे, महासचिव जितू टिनगुसले, राकेश ठाकरे, युवराज चावरे, आनंद आक्केवार तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी नगरसेविका प्राची आक्केवार यांनी संविधान बोर्ड भेट देत विद्यार्थिनीचा विशेष सत्कार केला.
गुणवंत विद्यार्थ्यांच्या या गौरवामुळे परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.







