HomeBreaking Newsभरधाव लोहखनिज ट्रकचा कारला धडक; चामोर्शीत २ तास रास्ता रोको, नागरिकांमध्ये...

भरधाव लोहखनिज ट्रकचा कारला धडक; चामोर्शीत २ तास रास्ता रोको, नागरिकांमध्ये संताप 

सोनू वाळके, उपसंपादक, लोकवाद न्युज.

चामोर्शी : सुरजागड येथील लायड मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या लोहखनिज वाहतुकीदरम्यान पुन्हा एकदा गंभीर अपघाताची घटना समोर आली आहे. आज दिनांक १७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे ९ वाजताच्या सुमारास, चामोर्शी येथील जुन्या लक्ष्मी गेटजवळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ हा अपघात घडला.

भरधाव वेगाने आणि ओव्हरलोड लोहखनिज घेऊन जाणाऱ्या ट्रकने (क्र. CG 04 PT 1651) समोरून येणाऱ्या कारला (क्र. MH 14 GV 8998) जोरदार धडक दिली. या अपघातात कारचालक रुपेश यशवंत लाड (वय ४०, रा. चामोर्शी) यांच्या कारचा उजवा भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला.

घटनेवेळी कारमध्ये त्यांची पत्नी श्रुतिका रुपेश लाड (वय ३५), मुलगी वेदश्री (वय ६) व लावण्य (वय १) प्रवास करत होते. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

अपघातानंतर संतप्त कुटुंबीय व स्थानिक नागरिकांनी तात्काळ रास्ता रोको आंदोलन छेडत सुमारे २ तास वाहतूक ठप्प ठेवली. यामध्ये माजी पंचायत समिती उपसभापती यशवंत लाड, मुरखळा (माल) चे माजी सरपंच भुदेवी लाड आदींचा सहभाग होता. या आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच चामोर्शी पोलीस निरीक्षक दीपक डोंब यांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांशी चर्चा केली. संबंधित ट्रक चालकावर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

दरम्यान, सुरजागड परिसरातून होणाऱ्या ओव्हरलोड व भरधाव ट्रक वाहतुकीमुळे वारंवार अपघात घडत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. चामोर्शी शहरातून जाणाऱ्या अशा वाहतुकीवर तात्काळ नियंत्रण आणावे, वेगमर्यादा काटेकोरपणे लागू करावी, तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments