📰 यशाची परंपरा कायम! एल.एम.बी. पब्लिक स्कूलचा सीबीएसई परीक्षेत ऐतिहासिक निकाल; ११ विद्यार्थ्यांना आयटीत १००/१००
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी):
एन. एच. एज्युकेशन सोसायटी संचलित एल. एम. बी. पब्लिक स्कूल, ब्रह्मपुरी या शाळेने सीबीएसई १० वी बोर्ड परीक्षेत यंदाही दणदणीत यश मिळवत आपली परंपरा कायम राखली आहे. शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून तब्बल ३६ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
यावर्षी शैक्षणिक सत्र २०२५-२६ मध्ये शंतनु निलेश राऊत (९७.४%) याने प्रथम क्रमांक पटकावला. त्यापाठोपाठ सोहम सागर आखाडे (९७.२%) द्वितीय, सम्यक मनोरंजन धोंगडे (९७%) तृतीय, शौर्य मिलिंद कुरसुंगे (९६.८%) चतुर्थ आणि सक्षम चंद्रशेखर वसाके (९६.६%) पाचव्या क्रमांकावर राहिले.
यंदाच्या निकालात विद्यार्थ्यांनी विषयनिहायही उत्कृष्ट कामगिरी करत इतिहास घडवला. मराठी विषयात सम्यक धोंगडे, समृद्धी ठाकरे, वल्लभ हर्षे आणि सात्विकी राऊत यांनी १०० पैकी १०० गुण मिळवले.
विशेष म्हणजे माहिती तंत्रज्ञान (IT) विषयात तब्बल ११ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवत नवा विक्रम प्रस्थापित केला. यात शंतनु राऊत, सोहम आखाडे, सक्षम वसाके, सार्थ लेनगुरे, उत्कर्ष नाकाडे, मैथिली चौधरी, पूर्वा हेमके, अयान वडसरिया, पियुष चहांदे, स्नेहित भानारकर आणि रूचा ढोक यांचा समावेश आहे.
या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा स्नेहलताताई भैय्या, सचिव अशोक भैय्या, सदस्य गौरव भैय्या, शाळेच्या संचालिका अशिता भैय्या आणि प्राचार्य कादिर कुरेशी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
उपप्राचार्य, पर्यवेक्षिका आणि सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनीही विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शिक्षक व पालकांच्या मार्गदर्शनाला दिले.
या घवघवीत यशामुळे संपूर्ण ब्रह्मपुरी परिसरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.







