HomeBreaking Newsसुधीर मुनगंटीवारांचा ‘ऑन द स्पॉट’ निकाल; ८ महिन्यांपासून रखडलेले वनमजुरांचे वेतन अखेर...

सुधीर मुनगंटीवारांचा ‘ऑन द स्पॉट’ निकाल; ८ महिन्यांपासून रखडलेले वनमजुरांचे वेतन अखेर मार्गी

सुधीर मुनगंटीवारांचा ‘ऑन द स्पॉट’ निकाल; ८ महिन्यांपासून रखडलेले वनमजुरांचे वेतन अखेर मार्गी

प्रविण मोहुर्ले व पंकज लाडवे यांचा पुढाकार

गौतम जीवने (मुल प्रतिनिधी): प्रशासकीय दिरंगाईमुळे तब्बल आठ महिन्यांपासून वेतनाच्या प्रतीक्षेत असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडो वनमजुरांना अखेर दिलासा मिळाला आहे. माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे हा प्रश्न अवघ्या काही तासांत निकाली निघाला.

चंद्रपूर वनविभागात कार्यरत संगणकचालक, मजूर, रोपवाटिका कर्मचारी व चौकीदार यांचे जुलै २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीतील वेतन रखडले होते. ‘वेज बिल मॉनिटरिंग सिस्टीम’मधील तांत्रिक अडचणींचे कारण देत प्रशासनाकडून वेळकाढूपणा होत होता. यामुळे अनेक मजुरांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले होते.

दरम्यान, ही बाब पुढे येताच मुनगंटीवार यांनी तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. बैठकीत त्यांनी आक्रमक भूमिका घेत, “मजुरांच्या घामाचा पैसा रोखून धरणे अजिबात सहन केले जाणार नाही,” असा इशारा प्रशासनाला दिला.

त्यांच्या निर्देशानंतर मुख्य वनसंरक्षकांना तातडीने निधी वितरणाचे आदेश देण्यात आले. परिणामी, प्रलंबित वेतन त्वरित निकाली काढण्याची प्रक्रिया सुरू झाली. तसेच, आर्थिक अडचणीमुळे कामावर अनुपस्थित राहिलेल्या मजुरांना सन्मानाने पुन्हा रुजू करून घेण्याचे निर्देशही देण्यात आले.

या निर्णयामुळे शेकडो कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्या घरातील आर्थिक चक्र पुन्हा सुरू होण्यास मदत होणार आहे. येत्या दोन दिवसांत सर्व कर्मचारी पुन्हा कामावर रुजू होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला असून, मजुरांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments