प्रेरणा बौद्ध मंडळ व सावित्री रमाई महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने लुंबिनी नगर, चामोर्शी येथे फुले-आंबेडकर संयुक्त जयंती उत्साहात साजरी; भव्य भीम रॅलीने वातावरण दुमदुमले
चामोर्शी (प्रतिनिधी) – प्रेरणा बौद्ध मंडळ व सावित्री रमाई महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने १४ एप्रिल २०२६ रोजी लुंबिनी नगर, चामोर्शी येथे राष्ट्रपिता महामानव ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात मा. आयु. जास्वंदा जनबंधु मॅडम (सेवानिवृत्त अध्यापिका) यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रेरणा बौद्ध मंडळाचे अध्यक्ष मा. आयु. किशोर कुमार वासनिक सर होते, तर सहअध्यक्ष म्हणून सावित्री रमाई महिला मंडळाच्या अध्यक्ष मा. आयु. रिना दुधे मॅडम यांनी भूमिका निभावली.
यावेळी मार्गदर्शक म्हणून मा. आयु. डी. एस. रामटेके सर (उपाध्यक्ष, प्रेरणा बौद्ध मंडळ) उपस्थित होते. संचालन थेमसकर सर तर प्रमुख अतिथी म्हणून मा. आयु. प्रतिभा डी. उंदिरवाडे मॅडम, मा. आयु. योगिता कुळवे (उपाध्यक्ष, सावित्री रमाई महिला मंडळ) तसेच के. डी. मेश्राम साहेब व भैसारे साहेब यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांच्या विचारांवर प्रकाश टाकत समाजप्रबोधनाचे महत्त्व अधोरेखित केले. सायंकाळी लुंबिनी नगर परिसरात भव्य भीम रॅली काढण्यात आली. या रॅलीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. “जय भीम”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
कार्यक्रमाची सांगता सामूहिक भोजनाने करण्यात आली. या यशस्वी आयोजनासाठी दोन्ही मंडळांच्या पदाधिकारी व सदस्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.