चिचाळा येथे ऐन उन्हाळ्यात हातपंप बंद; नागरिकांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई
मूल तालुका प्रतिनिधी लोकवाद :
मूल पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या चिचाळा (कवडपेठ) परिसरात ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. परिसरातील अनेक हातपंप मागील काही महिन्यांपासून बंद पडलेले असून नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,
मच्छिंद्र गुरनुले (चिचाळा हेटी जवळील हातपंप)
प्रवीण मांकिवार (बेघर परिसरातील हातपंप)
प्रकाश वाढई (कवडपेठ येथील हातपंप)
हे तीनही हातपंप बंद अवस्थेत आहेत.
सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना पाण्याची टंचाई अधिकच जाणवत असून महिला, वृद्ध आणि लहान मुलांना पाणी आणण्यासाठी लांब अंतर पार करावे लागत आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, स्थानिक नागरिक प्रविण बोबाटे यांनी पंचायत समिती मूल पंचायत समिती येथे सूचना दिलेली असून तात्काळ दुरुस्तीची मागणी केली आहे.
प्रशासनाने तातडीने लक्ष घालून संबंधित विभागामार्फत पाहणी करून हातपंप दुरुस्त करावेत, अन्यथा नागरिक आंदोलनाचा इशारा देत आहेत.







