लोकवाद उलगड भाग 1 उद्या अवश्य वाचा.
कर्मवीर ग्राउंडच्या सावलीत मालधक्का; मुल शहरात संताप उसळला
लोकवाद प्रतिनिधी | मुल | दिनांक : 3/4
सूरजागड प्रकल्पातील कच्च्या लोहखनिजाच्या वाहतुकीसाठी मुल–मारोडा रेल्वे स्थानक परिसरात प्रस्तावित मालधक्का उभारणीचे काम पुन्हा सुरू झाल्याने शहरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मागील वर्षी जनतेच्या विरोधामुळे स्थगित झालेले हे काम पुन्हा सुरू झाल्याने प्रशासनाच्या निर्णय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्रस्तावित ठिकाणालगतच असलेले कर्मवीर कॉलेज मैदान हे शहराचे “फुफ्फुस” मानले जाते. दररोज शेकडो नागरिक मॉर्निंग-इव्हनिंग वॉकसाठी येथे येतात. क्रिकेट, कबड्डी, व्हॉलीबॉल सामने, तालीम, पोलीस भरती सराव, तसेच सामाजिक-धार्मिक कार्यक्रम या मैदानावर नियमितपणे होतात.
नागरिकांचा आरोप आहे की, मालधक्यामुळे निर्माण होणारी धूळ, कर्कश आवाज व सततची वर्दळ यामुळे या मैदानाचा वापर धोक्यात येणार आहे. “आरोग्य जपण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनाच आता आजारांचा सामना करावा लागणार का?” असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. सावलीत मालधक्का; मुल शहरात संताप उसळला







