चंद्रपूर महानगरपालिका स्थायी समितीच्या सभापतीपदी सौ. मनस्वीताई गिऱ्हे यांचा दणदणीत विजय
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिका स्थायी समितीच्या निवडणुकीत सौ. मनस्वीताई संदीप गिऱ्हे यांनी सभापती पदावर दणदणीत विजय संपादन केला. या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळात विशेष लक्ष लागले होते. अखेर ईश्वराच्या कृपेने व सहकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे त्यांनी विजय मिळवला.
सभापतीपदी निवड झाल्यानंतर विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून कार्यकर्ते व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेच्या विकासकामांना अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरातून मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून पुढील कार्यकाळासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत.







