HomeBreaking Newsभोगवटा वर्ग-2 ते वर्ग-1 प्रक्रियेबाबत संभ्रम; आवश्यक कागदपत्रांची माहिती

भोगवटा वर्ग-2 ते वर्ग-1 प्रक्रियेबाबत संभ्रम; आवश्यक कागदपत्रांची माहिती

🔍 लोकवाद उलगडा (अंतिम भाग)

भोगवटा वर्ग-2 ते वर्ग-1 प्रक्रियेबाबत संभ्रम; आवश्यक कागदपत्रांची माहिती

दुर्योधन घोंगडे | लोकवाद

भोगवटादार वर्ग-2 प्रकारातील जमीन वर्ग-1 करण्याच्या प्रक्रियेबाबत निर्माण झालेल्या संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर लोकवाद तर्फे सुरू असलेल्या उलगडा मालिकेचा अंतिम भाग आज प्रसिद्ध करण्यात येत आहे. काही शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार सातबारावरील सर्व धारकांना तहसील कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगितले जात आहे, तर काही प्रकरणांमध्ये अशी अट नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे या प्रक्रियेत एकसमान निकष लागू होत आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबीर अभियान अंतर्गत नागरिकांना विविध महसूल सेवा सुलभपणे उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या अभियानात भोगवटा वर्ग-2 जमीन वर्ग-1 रूपांतरणासह अनेक सेवा देण्यात येत आहेत.

📄 आवश्यक कागदपत्रे

भोगवटा वर्ग-2 जमीन वर्ग-1 करण्यासाठी साधारणपणे खालील कागदपत्रांची आवश्यकता असते:

सातबारा उतारा

फेरफार (Mutation) उतारा

जमीनधारकाचा अर्ज

ओळखपत्र (आधार / मतदान ओळखपत्र)

वारसांची माहिती / संमती (लागू असल्यास)

इतर महसूल संबंधित कागदपत्रे

🧾 अभियानात मिळणाऱ्या इतर सेवा

राजस्व समाधान शिबीर अभियानात खालील सेवा देखील दिल्या जात आहेत:

सातबारावर वारस नोंद करणे / मृताचे नाव कमी करणे

सातबारातील चूक दुरुस्ती

उत्पन्न प्रमाणपत्र

जात प्रमाणपत्र

अधिवास व नॉन-क्रीमीलेयर दाखले

संजय गांधी / इंदिरा गांधी / श्रावण बाळ / अपंग योजना मार्गदर्शन

दरम्यान या संदर्भात तहसील प्रशासनाची भूमिका जाणून घेण्यासाठी तहसीलदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र बातमी लिहीपर्यंत त्यांची अधिकृत प्रतिक्रिया प्राप्त होऊ शकली नाही.

भोगवटा वर्ग-2 ते वर्ग-1 प्रकरण; शेतकऱ्यांचा संभ्रम कायम, स्पष्ट मार्गदर्शनाची अपेक्षा

“या विषयावर प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया मिळाल्यास लोकवादमध्ये प्रसिद्ध करण्यात येईल.”

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments