Homeचंद्रपूरमूल येथील शिवटेकडीवर महाशिवरात्री निमित्त भक्तिमय कार्यक्रम व साबुदाणा खिचडी वाटप

मूल येथील शिवटेकडीवर महाशिवरात्री निमित्त भक्तिमय कार्यक्रम व साबुदाणा खिचडी वाटप

मूल लोकवाद : महाशिवरात्री निमित्त मूल येथील शिवटेकडीवर दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवटेकडी उत्सव समिती, मूल यांच्या वतीने भक्तांसाठी भक्तीगीतांचा कार्यक्रम तसेच उपवासासाठी साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात येणार आहे.

मूल येथील स्वर्गीय जनार्धन मस्के यांना सुमारे 50 वर्षांपूर्वी साक्षात्कार झाला होता. त्या साक्षात्कारातून त्यांनी चंद्रपूर रोडवरील टेकडीवर भगवान शिवलिंगाची स्थापना केली. त्यानंतर ही टेकडी ‘शिवटेकडी’ म्हणून ओळखली जाऊ लागली. कालांतराने भाविकांनी येथे तिरुपती बालाजी, गणेशजी, हनुमान, राधा-कृष्ण यांच्या मूर्तींचीही स्थापना केली. वर्षभर भाविक येथे मनोभावे पूजा-अर्चना करीत असतात.

मागील अनेक वर्षांपासून महाशिवरात्रीच्या दिवशी हजारो भाविक शिवटेकडीवर दर्शनासाठी उपस्थित राहतात. स्वर्गीय जनार्धन मस्के यांच्या निधनानंतर शिवटेकडी उत्सव समितीच्या माध्यमातून हा उत्सव नियमितपणे साजरा केला जात आहे.

यंदाही महाशिवरात्री निमित्त उपवासासाठी साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात येणार असून सुप्रसिद्ध गायक विकी गायकवाड व त्यांच्या संचामार्फत भक्तिमय गीतांचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. हा संगीत कार्यक्रम दुपारी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत चालणार आहे.

या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिवटेकडी उत्सव समिती, मूल यांच्या वतीने करण्यात आले आहे.

मूल येथील शिवटेकडीवर महाशिवरात्री निमित्त भक्तिमय कार्यक्रम व साबुदाणा खिचडी वाटप

मूल : महाशिवरात्री निमित्त मूल येथील शिवटेकडीवर दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवटेकडी उत्सव समिती, मूल यांच्या वतीने भक्तांसाठी भक्तीगीतांचा कार्यक्रम तसेच उपवासासाठी साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात येणार आहे.

मूल येथील स्वर्गीय जनार्धन मस्के यांना सुमारे 50 वर्षांपूर्वी साक्षात्कार झाला होता. त्या साक्षात्कारातून त्यांनी चंद्रपूर रोडवरील टेकडीवर भगवान शिवलिंगाची स्थापना केली. त्यानंतर ही टेकडी ‘शिवटेकडी’ म्हणून ओळखली जाऊ लागली. कालांतराने भाविकांनी येथे तिरुपती बालाजी, गणेशजी, हनुमान, राधा-कृष्ण यांच्या मूर्तींचीही स्थापना केली. वर्षभर भाविक येथे मनोभावे पूजा-अर्चना करीत असतात.

मागील अनेक वर्षांपासून महाशिवरात्रीच्या दिवशी हजारो भाविक शिवटेकडीवर दर्शनासाठी उपस्थित राहतात. स्वर्गीय जनार्धन मस्के यांच्या निधनानंतर शिवटेकडी उत्सव समितीच्या माध्यमातून हा उत्सव नियमितपणे साजरा केला जात आहे.

यंदाही महाशिवरात्री निमित्त उपवासासाठी साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात येणार असून सुप्रसिद्ध गायक विकी गायकवाड व त्यांच्या संचामार्फत भक्तिमय गीतांचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. हा संगीत कार्यक्रम दुपारी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत चालणार आहे.

या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिवटेकडी उत्सव समिती, मूल यांच्या वतीने करण्यात आले आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments