HomeBreaking Newsभेंडाळा–चामोर्शी महामार्गावर ट्रकची धडक; 15 मेंढ्यांचा मृत्यू, मेंढकरी गंभीर जखमी

भेंडाळा–चामोर्शी महामार्गावर ट्रकची धडक; 15 मेंढ्यांचा मृत्यू, मेंढकरी गंभीर जखमी

भेंडाळा–चामोर्शी महामार्गावर ट्रकची धडक; 15 मेंढ्यांचा मृत्यू, मेंढकरी गंभीर जखमी

सोनू वाळके उपसंपादक  लोकवाद : आज दिनांक 13 फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास भेंडाळा–चामोर्शी महामार्गालगत शेतशिवारात मेंढकरी मारोती रामा अन्नावार हे आपल्या मेंढ्यांसह मुक्कामी होते. रात्री शेतात विसावा घेतल्यानंतर सकाळी मेंढ्यांना चरायला घेऊन जात असताना दुर्दैवी अपघात घडला.

सुरजागड परिसरातून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने मेंढ्यांच्या कळपाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात 15 मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर 12 मेंढ्या गंभीर जखमी झाल्या आहेत.

घटनेच्या वेळी रस्त्यावर वाहने व नागरिकांची वर्दळ नसल्याचा फायदा घेत संबंधित ट्रकचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला.

अपघातात मेंढकरी मारोती रामा अन्नावार हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने चामोर्शी येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे रेफर करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच चामोर्शी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक डोंब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.भेंडाळा–चामोर्शी महामार्गावर ट्रकची धडक; 15 मेंढ्यांचा मृत्यू, मेंढकरी गंभीर जखमी
चामोर्शी : आज दिनांक 13 फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास भेंडाळा–चामोर्शी महामार्गालगत शेतशिवारात मेंढकरी मारोती रामा अन्नावार हे आपल्या मेंढ्यांसह मुक्कामी होते. रात्री शेतात विसावा घेतल्यानंतर सकाळी मेंढ्यांना चरायला घेऊन जात असताना दुर्दैवी अपघात घडला.
सुरजागड परिसरातून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने मेंढ्यांच्या कळपाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात 15 मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर 12 मेंढ्या गंभीर जखमी झाल्या आहेत.
घटनेच्या वेळी रस्त्यावर वाहने व नागरिकांची वर्दळ नसल्याचा फायदा घेत संबंधित ट्रकचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला.
अपघातात मेंढकरी मारोती रामा अन्नावार हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने चामोर्शी येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे रेफर करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच चामोर्शी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक डोंब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments