Homeगडचिरोलीचामोर्शीत २१ ला सार्वजनिक शिव - भिम जयंतीची जय्यत तयारी.

चामोर्शीत २१ ला सार्वजनिक शिव – भिम जयंतीची जय्यत तयारी.

सोनू वाळके, उपसंपादक, लोकवाद न्युज.

चामोर्शी : सार्वजनिक शिव – भिम जयंती उत्सव समिती चामोर्शीच्या वतीने २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.०० वाजता प्रबोधनात्मक सार्वजनिक जयंती महोत्सव बाजार चौक चामोर्शी येथे संपन्न होणार आहे.
संत तुकाराम महाराज , संत रोहिदास महाराज , संत सेवालाल महाराज , संत गाडगे महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त जयंतीच्या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन उच्च न्यायालय संभाजीनगरच्या प्रसिद्ध विधिज्ञ ॲड. वैशाली डोळस , उद्घाटक नगराध्यक्षा मान. जयश्रीताई वायलालवार , विशेष अतिथी चामोर्शी पो. स्टे. चे पोलीस निरीक्षक मान. दीपक डोंब व अध्यक्षस्थानी वैद्यकिय अधिक्षक डॉ. प्रविण किलनाके उपस्थित राहणार आहेत.
संयुक्त जयंती महोत्सवाचे मुख्य वैशिष्टय म्हणजे चामोर्शी नगर पंचायतसह ५५ इतक्या सामाजिक व जातीय संघटनांच्या वतीने मागील ११ वर्षापासुन हा जयंती महोत्सव विविध नामवंत वक्ते व किर्तनकार यांच्या प्रबोधनाने आयोजित करून नगरात सामाजिक सलोखा राखण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य केले जात आहे.
या महोत्सवाला चामोर्शी नगरातील व परिसरातील सर्व जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन सार्वजनिक शिव – भिम जयंती उत्सव समिती चामोर्शीच्या वतीने करण्यात आले आहे .

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments